शिर्डी प्रतिनधी/५मे२०२५
अलीकडच्या जम्मू-काश्मीरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील शिर्डीच्या प्रसिद्ध साईबाबा मंदिरावर एक भयंकर धमकी आली आहे. ही धमकी एका ईमेलद्वारे साई संस्थानच्या अधिकृत ईमेलवर प्राप्त झाली आहे. मंदिराची सुरक्षा करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मंदिर परिसराची तपासणी केली आणि कडक सुरक्षा पुकारली आहे. ही धमकी खरी आहे की फक्त खोडसाळपणा हे शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.
दि.५ मे पर्यंतच्या घटनाक्रमात, नुकत्याच महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी शिर्डीला भेट दिली होती. त्यांनी तेव्हा पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत पाकिस्तानला उत्तर दिले जाईल, असे सूचक वक्तव्य केले होते. यानंतर काही तासांतच ही धमकी आली आहे, ज्यामुळे विशेष चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच, दि 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या जिल्हा आहिल्यानगर जामखेड तालुक्यातील चोंडीमध्ये महत्त्वपूर्ण बैठकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात प्रशासनाचा फोकस असल्यामुळे सुरक्षा यंत्रणांचे आव्हान आणखी वाढले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा