चोंडी प्रतिनधी/५मे२०२५
चौंडी (जामखेड) येथे दि. 6 मे 2025 रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक होत आहे. ही बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी होत असल्याने त्यासाठी अनेक स्तरांवर तयारी सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वसमावेशक नियोजन केले असून मंडपाच्या विस्तीर्ण व्यवस्थेपासून ते सुरक्षेच्या प्रत्येक अंगाला लक्ष दिले जात आहे.
या बैठकीसाठी 41 मंत्र्यांचा प्रोटोकॉल निश्चित करण्यात आला असून त्यांच्यासाठी वाहन, वातानुकूलित कक्ष, पत्रकार कक्ष, स्वयंपाकघर इत्यादी सुविधांची व्यवस्था केली आहे. भेटीसाठी येणारे आमदार-खासदार, मुख्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठीही विशेष कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जर्मन हँगर प्रकारचा मंडप:
बैठकीसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाची रचना ‘जर्मन हँगर’ प्रकारात केली गेली आहे ज्याचा आकार 265 फूट लांब आणि 132 फूट रुंद असेल. या मंडपात सुमारे तीन हजार खुच्र्यांची सोय करण्यात येणार आहे आणि इंटरनेट सुविधाही पुरविण्यात येणार आहे.
सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन:
सुरक्षेच्या दृष्टीने तब्बल 17 समित्यांची नेमणूक करण्यात आली असून, मुख्य सचिवांच्या कार्यालयातील पथक चौंडीत तळ ठोकणार आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी अधिकाऱ्यांसह बैठक घेत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आहे.
आर्थिक निधी:
या बैठकीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी केशवून घेण्यात आला असून, यातून वाहतूक, सुरक्षा आणि अन्य नियोजन व्यवस्था करण्यात येत आहे.
प्रमुख उपस्थिती:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होणार आहेत.
सभापती राम शिंदे यांची पाहणी:
सद्य सभापती प्रा. राम शिंदे यांनीही चौंडीत पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर उपस्थित होते. सभापती राम शिंदे यांनी सांगितले की ही बैठक राज्य शासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यासाठी सर्व स्तरांवर सज्जता केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा