जामखेड प्रतिनधी/४मे२०२५
जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट यांचे वडील रावसाहेब जगन्नाथ वराट गुरुजी वय 85 यांचे अल्पशा आजारानेकाल साकत येथे राहत्या घरी निधन झाले. यामुळे वराट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगाव व घुमरी पिंपरी येथे रावसाहेब जगन्नाथ वराट गुरुजी यांनी संपूर्ण सेवा केली होती गेली 2001 मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते त्यांचा स्वभाव सर्वांसोबत मनमिळाऊ होता.
काही दिवसांपूर्वी रावसाहेब वराट गुरुजी यांना त्रास होऊ लागल्याने अहमदनगर येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना घरी आणले होते . काल त्यांचे राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी ( विवाहित ), सुन, नातवंडे असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा