खर्डा प्रतिनधी : २९ जानेवारी
ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे खर्डा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोहरी व वाकी या दोन्ही जलाशयांमध्ये मुबलक पाणी असताना ग्रामस्थांना ११ दिवसांनंतरही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. वारंवार येणाऱ्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कमालीचे उदाशिन असल्याचे दिसत आहे. या शिवाय अनेक समस्यांनी खर्डा ग्रामस्थ त्रस्त असून याबाबत दोनच दिवसांपूर्वी म्हणजे दि. २७ जानेवारी रोजी झालेले ग्रामसभेत महिला व नागरिकांनी तिव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पाणी टंचाई व इतर नागरी समस्यांबाबत कोणाकडे न्याय मागवा असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा हे पंचक्रोशीतील सर्वात मोठे गाव आहे. बारा वाड्या व तेरावा खर्डा अशी गावाची ओळख आहे, तर १७ सदस्य असणारी अशी येथील मोठी ग्रामपंचायत आहे. मात्र
अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेले ११दिवस पलटून पण खर्डा ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे खर्डा वासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. खर्ड्याची परिस्थिती अशी झाली की धरण उशाला अन् कोरड घशाला. आता प्रश्न तरी किती वेळा मांडायचा आणि पाण्याचा प्रश्न सुटणार तरी कधी. असा नागरिकांना पडलेला हा नेहमीच प्रश्न आहे.
खर्डा गावाला पाणीपुरवठा करणारे मोहरी व खैरी हे दोन्ही तलाव नुसते भरलेले नाहीत तर तुडुंब भरून वाहत आहेत. पाण्याचा प्रश्न लवकर न सुटल्यास गावकरी अंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
No comments:
Post a Comment