खर्डा प्रतिनिधी : २९ जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एक निंदनीय प्रकार घडला असून भुम तालुक्यातील ईट येथील चार जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर असे की, दि. २७ जानेवारी रोजी दुपारी १ : ०० वाजताचे सुमारास यातील फिर्यादी खर्डा येथील रत्नसुरेश मंगल कार्यालया जवळ लग्नासाठी आली असाता यातील आरोपी राम डंबरे, सुभाष चव्हाण, संभाजी उर्फ शंभु चव्हाण व ओम भागवत सर्व रा. ईट ता.भुम जि.उस्मानाबाद
यांनी फिर्यादी यांना हाताने ईशारे करुन, डोळा मारुन, अंगाला स्पर्श करून शारीरीक संबंधाची मागणी करून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तण केले आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरून
यातील आरोपी राम डंबरे, सुभाष चव्हाण, संभाजी उर्फ शंभु चव्हाण व ओम भागवत यांचे विरुद्ध भादवि कलम 354 (अ), 509, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संभाजी शेंडे हे करीत आहेत
No comments:
Post a Comment