जामखेड प्रतिनिधी : ३० जानेवारी
जामखेड शहरातील मंदिर, मस्जिद, दर्गा व महत्वाच्या अशा धार्मिक व अध्यात्मिक स्थळांचे पावित्र्य व सुरक्षा कायम राहावी यासाठी पुजारी, मौलाना किंवा ट्रस्टी यांनी आवश्यक त्या उपाययोजना योजना कराव्यात. असे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले असून यासंदर्भात जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने काल दि. ३० जानेवारी रोजी पोलीस स्टेशन येथे मंदिर, मस्जिद, दर्गा या धार्मिक स्थळांचे ट्रस्ट अध्यक्ष, मंदिर पुजारी, मस्जिदचे ट्रस्टी,मौलाना यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकी मध्ये मंदिर, मस्जिद, दर्गा यांचे सुरक्षा संदर्भात खालीलप्रमाणे मार्गदर्शन व सूचना दिल्या.
१) मंदिर ,मस्जिद व इतर सर्व धार्मिक स्थळांना चांगल्या प्रतीचे cctv कॅमेरे बसवावेत.(HD)
२) सर्व धार्मिक स्थळांना खाजगी सुरक्षा रक्षक/स्वयंसेवक नेमावा.
३) धार्मिक वाद किंवा इतर जुने वाद असतील तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी.
४) मंदिर/मस्जिद ट्रस्ट ,पुजारी ,मौलाना यांची गावपातळीवर जातीय सलोखा मिटिंग घ्यावी.
५) यात्रा ,उत्सव ,व इतर कार्यक्रम जर आपले गावात असतील तर त्या कार्यक्रमाची प्रत्येक विभागाची परवानगी घेण्यात घ्यावी.
६) यात्रा उत्सव /व इतर धार्मिक कार्यक्रम अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त याची पोलीस स्टेशन ला मागणी करावी.
७) प्रत्येक मंदिर व मस्जिद मध्ये नोंद वही ठेवण्यात यावी.
८) आपले मंदिर मस्जिद दर्गा यांचे ट्रस्ट यादी ,मौलाना ,व पुजारी यांची यादी पोलीस स्टेशन ला द्यावी.
९) पोलीस स्टेशन चा नंबर आपले मंदिर/मस्जिद आवारात सर्वांना दिसेल असा लावावा.
या व इतर अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या मिटिंग करिता मंदिर, मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष, पुजारी, मौलाना, पोलीस पाटील असे ४६ लोक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment