जामखेड प्रतिनिधी : ५ जानेवारी
जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणारी व नागपूर येथील मुळ रहिवासी असलेली व जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजला बी. एच. एम. एस. च्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या डिंपल पाटील या विद्यार्थ्यांनीने आत्महत्या केली आहे.
याबाबत माहिती मिळताच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन लटकलेल्या आवस्थेतील मृतदेह खाली उतरून व आवश्यक ते सोपस्कार करत सदर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे पाठवण्यात आला आहे.
सदर आत्महत्या ग्रस्त विद्यार्थींनी तपनेश्वर भागातील मुकुंद जवकर यांच्या इमारतीत भाडे तत्त्वावर राहात होती. व जामखेड शहरालगत असलेल्या रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे बी. एच. एम. एस. च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. अगदी काही दिवसांपूर्वीच तिसऱ्या वर्षाच्या थिअरीचे पेपर झाले होते. व प्रॅक्टीकल सुरू होते. या मुलींने आत्महत्या कधी केली हे समजले नाही. सदर मुलींच्या आईने ती फोन घेत नसल्याने डिंपल हिच्या रुममध्ये राहणाऱ्या ईतर मुलींशी संपर्क केल तेव्हा हा प्रकार लक्षात आल्याने तात्काळ जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क केला असता. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचत डिंपल पाटील हिचा लटकलेला मृतदेह खाली उतरला व सर्व कायदेशीर कार्यवाही करून मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून. सदर मयत मुलीची आई व नातेवाईक नागपूर येथून जामखेडकडे निघाले असून ते आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून देण्यात आली आहे.
घटनेची माहिती समजताच मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे हेही तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतदेह रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी नेहमीच प्रमाणेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आवश्यक ती मदत केली. तसेच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांच्यासह पोलीस नाईक संजय लोखंडे, सचिन पिरगळ, अरूण पवार सतीश दळवी, आजीनाथ जाधव, दिनेश गंगे आदी पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच महिला दक्षता समितीच्या रूक्साना पठाणयावेळी उपस्थित होते.
या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे तपनेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
No comments:
Post a Comment