खर्डा प्रतिनिधी : १९ जानेवारी
खर्डा पोलीस रात्रीची गस्तीवर असताना आढळून आलेला व सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा पोलीस स्टेशनला दाखल गुन्हातील चोरीचा ट्रॅक्टर खर्डा पोलीसांनी मुळ मालकाच्या स्वाधीन केला आहे.
खर्डा पोलीसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा ट्रँक्टर सापडला
सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने व हद्दीत जामखेड खर्डा रोडवरील दरडवाडी वळनावर दि. १४ जानेवारी रोजी रात्र गस्त घालत असताना एक ट्रॅक्टर दिसला व त्या ट्रॅक्टर बाबत खर्डा पोलीसांनी माहीती घेतली असता तो ट्रॅक्टर करमाळा या ठिकाणचा असुन तो चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यानुसार करमाळा पोलीसांमार्फत ट्रॅक्टरच्या मुळ मालकाशी संपर्क साधला. तसेच खर्डा पोलीसांनी करमाळा पोलीसांना बोलावुन सदर ट्रॅक्टर त्यांचे ताब्यात दिला आहे. या घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल सय्यद, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस काॅन्स्टेबल शेषराव म्हस्के , पोलीस काॅन्स्टेबल वैजीनाथ मिसाळ, आवारे यांनी हि कामगीरी केली .
No comments:
Post a Comment