जामखेड प्रतिनिधी- २१ जानेवारी
जामखेड तालुक्याचे सुपुत्र व मागील फडणवीस सरकारमध्ये अनेक खात्यांचे मंत्री राहीलेले आ. प्रा. राम शिंदे यांच्यावर भाजपाने आणखी एक जबाबदारी देऊन त्यांचे राजकीय वजन आणखी वाढवले आहे.
आगामी काळात भारतीय जनता पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्याने काही निवडी केल्या आहेत. त्यानुसार भाजपा प्रदेश मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. यामध्ये पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आ. प्रा. राम शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र भाजपने पक्षाची भूमिका मीडियाच्या माध्यमांतून जावी यासाठी भाजपा प्रदेश मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर केल्या आहेत. पत्रकार नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केशव उपाध्ये 'मुख्य प्रवक्ते' तर विश्वास पाठक आणिअजित चव्हाण हे 'सह-मुख्यप्रवक्ते' राहतील. त्याचबरोबर 9 प्रवक्ते तसेच विषयानुरुप तज्ञ अशा 31 पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्तीकरण्यात आली आहे.
भाजपने नियुक्त केलेले प्रवक्ते आणि पॅनेलिस्ट सदस्य खालील प्रमाणे
पक्ष प्रवक्ता : आ.प्रा.राम शिंदे, आ.राम कदम, आ.अमित साटम, भालचंद्र शिरसाट, शिवराय कुलकर्णी, श्रीमती श्वेता शालिनी, गणेश खणकर, अॅड.राजीव पांडे, कु.प्रेरणा होनराव यांची पक्ष
प्रवक्ता म्हणून तर पॅनेलिस्ट सदस्य म्हणून खा.डॉ. अनिल बोंडे (अमरावती), आ.निरंजन डावखरे (ठाणे), आ.प्रवीण प्रभाकर दटके (नागपूर), आ.सिध्दार्थ शिरोळे (पुणे), आ.श्वेता महाले (बुलढाणा), गणेश हाके (लातूर), अवधूत वाघ (मुंबई), राम कुलकर्णी (बीड), प्रवीण घुगे (संभाजीनगर), धर्मपाल मेश्राम (नागपूर), लक्ष्मण सावजी (नाशिक), मिलींद शरद कानडे (नागपूर), विनोद वाघ (वाशिम), मो.असिफ भामला (मुंबई), मकरंद नार्वेकर (मुंबई), श्री.प्रदीप पेशकार (नाशिक), श्रीमती दिपाली मोकाशी (मीरा भाईंदर), श्री.विनायक आंबेकर (पुणे), श्रीमती शिवानी दाणी (नागपूर), अॅड.आरती साठे (मुंबई), प्रो.आरती पुगांवकर (मुंबई), श्री.नितीन सुरेश दिनकर (अहमदनगर), श्रीमती प्रीती गांधी (मुंबई), श्रीमती राणी द्विवेदी-निघोट (मुंबई), श्रीमती श्वेता परुळकर (मुंबई), राम बुधवंत (संभाजीनगर), अली दारुवाला (पुणे), श्री.चंदन गोस्वामी (नागपूर), आशिष चंदारमा (अकोला), श्रीमती देवयानी खानखोजे (मुंबई), श्रीमती मृणाल पेंडसे (ठाणे)यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment