पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १७ फेब्रुवारी
कोणीही धार्मिक तेढ निर्माण होईल असे देखावे किंवा वक्तव्य न करणे, छ. शिवाजी महाराज जयंत मिरवणूक वेळेस वाद्य पारंपारिक वाजवणे, मिरवणूकी दरम्यान ट्रॅफिक जाम होणार नाही यासाठी मंडळांनी आपले स्तरावर स्वयंसेवक नेमावेत तसेच शिवजयंती करिता बंदोबस्त नेमण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली.
आज दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी जामखेड पोलीस स्टेशन येथे शांतता समिती, जातीय सलोखा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती यांची शिवजयंती अनुषंगाने शांतता मिटिंग पार पडली. यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी वरील सुचना व मार्गदर्शन केले.
तसेच दि. १९ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती व महाशिवरात्रीच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
१)कोणीही धार्मिक तेढ निर्माण होईल असे देखावे किंवा वक्तव्य करणार /दाखवणार नाही.
२) दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावतील असे वाद्य किंवा गाणे वाजवणार नाहीत.
३)छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक वेळेस वाद्य पारंपारिक असावीत. 4)शासनाचे परिपत्रक नुसार शिवजयंती साजरी करण्यात यावी.
५)मिरवणूक दरम्यान ट्रॅफिक जाम होणार नाही यासाठी आपले स्तरावर स्वयंसेवक उपस्थित ठेवावेत.
६)शिवजयंती करिता बंदोबस्त नेमण्यात येणार असून याकरीता खालील बंदोबस्त असणार आहे.
१ पोलीस उपअधीक्षक, १पोलीस निरीक्षक, ३ सहायक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक, ३ पोलीस अंमलदार, महिला पोलीस, १ स्ट्रायकिंग फोर्स, ४९ होमगार्ड, १० पोलीस मित्र,
असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
जामखेड पोलीस स्टेशन येथे पार पडलेल्या या
मिटींगसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, शिवप्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते समीर चंदन, काँग्रेसचे राहुल उगले, सनी सदाफुले, मजूर फेडरेशनचे संचालक प्रकाश सदाफुले, आदिवासी महासंघाचे प्रकाश काळे, वंचीतचे तालुकाध्यक्ष अतिष पारवे, माजी नगरसेवक अमित जाधव, लक्ष्मण ढेपे, दिगंबर चव्हाण,
शामिर सय्यद, ताहेर खान, आकाश साठे,विनायक राऊत,
रमेश कांबळे महसूल प्रतिनिधी, पांडुरंग शिंदे, नवनाथ गव्हने, पंढरीनाथ शिकरे, आदी मान्यवर व शांतता समिती सदस्य, जातीय सलोखा समिती, शिवजयंती उत्सव समिती, पोलीस मित्र व महसूल विभागाचे प्रतिनिधी असे ३५ ते ४० लोक हजर होते. मिटिंगचे आयोजन पोलीस नाईक अविनाश ढेरे व पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव गोपनीय शाखा यांनी केले होते.
No comments:
Post a Comment