जामखेड प्रतिनिधी : ११ फेब्रुवारी
जामखेडच्या भुमीत मोठी ताकद आहे. याभुमी ऐतिहासिक खर्डा चोडींसह जी पवित्र ठिकाणं आहेत त्यासह मतदारसंघातील ऐतिहासिक व पर्यटनाच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे तुम्ही लिहीले ते करण्यासाठी मी काम करत आहे. तसेच महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी मोठे काम केले. एकंदरच मी जे काम करत आहे ते तुम्ही लिहीलं तेच तुम्ही छापल पण विरोधकांना ते आवडलं नसेल तर त्यावरून पत्रकारांनी काय छापावे व न छापावे हे ठरवून लोकप्रतिनिधी त्यांच्यावर दबाव टाकत असतील व पत्रकारांचा स्वाभिमान दुखावला जात असेल पत्रकार ते खपवून घेणार नाहीत. पत्रकार लोक हितासाठी काम करत असतात, विविध समस्या व प्रश्न मांडून समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचे काम ते करत असतात. सर्वच पत्रकार मतदारसंघाच्या विकासासाठी चांगले काम करत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिंधी त्यांच्यावर चुकिच्या पध्दतीने दबाव टाकण्याचे काम करू नये असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले.
जामखेड येथील केशर हाॅल येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभासाठी पत्रकार संजय वारभोग, आशोक निमोणकर, नासीर पठाण, फायक अली सय्यद, मिठूलाल नवलाखा, दिपक देवमाने, वसंत सानप, याशिन शेख संतोष थोरात, श्वेता बापूसाहेब गायकवाड, अशोक वीर, किरण रेडे, मोहिद्दीन तांबोळी, दत्तात्रय राऊत, सुदाम वराट, अविनाश बोधले, नंदूसिंग परदेशी, लियाकत शेख, समीर शेख, सचिन अटकरे किरण शिंदे, शंकर कुचेकर, संदेश हजारे, राजू भोगील, शिवाजी इकडे, पप्पूभाई सय्यद, रिजवान शेख, रोहित राजगुरू, गणेश जव्हेरी, फारूक शेख, अनिल धोत्रे, शैफ अली सय्यद, सुजीत धनवे, किशोर दुशी, बाळासाहेब शिंदे, दत्तराज पवार, संतोष गर्जे, आ. रोहित पवार यांच्यावतीने समीर मोरे
तुळशीदास गोपाळघरे, रामहरी रोडे, विजय राजकर संतोष गर्जे, अजय अवसरे, पांडुरंग गर्जे, धनंजय साळूंके, निलेश दिवटे आदी पत्रकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर
यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की, कर्जत जामखेडचे नावलौकिक देशात झाले पाहिजे यादृष्टीने आपले काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर पाणंद रस्ते केले, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य या सुविधा कशा निर्माण होतील हे पाहिले. खर्डा, मिरजगाव पोलीस स्टेशन केले. मिरजगाव येथे ट्रामा केअर सेंटर तर जामखेड येथे अत्याधुनिक सुविधांनी युक्त उपजिल्हा रूग्णालय होत आहे तसेच कुसडगाव येथे एसआरपी ट्रेनिंग सेंटर होत आहे. सर्वात मोठा भगवा ध्वज खर्डा येथे फडकत आहे.
जलजीवन मिशनमध्ये महिलांच्या डोक्यावरील हंडा मुक्त होणारा देशातील पहिला मतदारसंघ म्हणून कर्जत जामखेडचा क्रमांक लागतो. आज प्रत्येकाच्या घरात नळाचे पाणी येत आहे. याचबरोबर रस्ते, वीज, पर्यटन, आरोग्य असे जनतेला अपेक्षित असणारे विकासाचे कामे मार्गी लागत आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना निलंबित केले तर त्याचे विपरीत परिणाम होतात सध्या मतदारसंघात हेच सुरू आहे.
माझी बातमी नाही लावली तरी चालेल पत्रकारांनी मतदारसंघातील जनतेला न्याय द्यावा त्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय द्यावा असे आवाहन केले जामखेड मधील पत्रकार स्वाभिमानी आहेत ते लोकप्रतिनिधींचा दबाव स्विकारत नाहीत. स्वाभिमानाची धार जामखेड मधील पत्रकारितेला आहे. तसेच सर्वाच्या सहकार्याने कर्जत जामखेडच्या विकासाचा गाडा चालवत आहे.
आदी पत्रकारकारांनी आपली मनोगते व्यक्त केली.
पत्रकार नासीर पठाण यांची कन्या दानिया नासीर पठाण ही पत्रकारिता करताना त्यांना किती अणचणींचा सामना करावा लागतो याचे विदारक सत्य आपल्या मनोगतातून मांडले.
यावेळी सपत्नीक उपस्थित असलेल्या पत्रकारांचा आ. रोहित पवार यांच्या हस्ते व इतर पत्रकारांचाही विविध प्रकारे यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच आयोजकांच्या वतीने कार्यक्रमाचे पुर्वी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत शितोळे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर मोरे यांनी केले
No comments:
Post a Comment