जामखेड प्रतिनधी-१०फेब्रुवारी
कर्जत-जामखेड मतदारसंघात रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यासाठी आमदार प्रा. राम शिंदे आणि खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी डिसेंबर २०२२ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात प्रस्तावित केलेल्या मतदारसंघातील ५ प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी १० कोटी रूपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून सदर कामांची ई-डेंटर प्रक्रिया सुरु झाली आहे, यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघात रस्त्यांचे मजबुत जाळे निर्माण करण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे आणि खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. डिसेंबर २०२२ च्या नागपूर अधिवेशनात सुचवलेल्या ५ प्रमुख रस्त्यांच्या कामांना मंजुर मिळाली आहे. यासाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. या कामांची ई डेंटर प्रक्रिया सुरु झाली आहे. लवकरच या कामांना प्रारंभ होणार असल्याने मतदारसंघातील जनतेत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
कर्जत -जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून शासन दरबारी जोरदार पाठपुरावा हाती घेतला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून मतदारसंघासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजुर करून आणला आहे, तसेच स्थानिक विकास निधीतून कोट्यावधी रूपयांची कामे प्रस्तावित केली आहेत, यामुळे मतदारसंघात आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून विकासाचा नवा झंझावात निर्माण झाला आहे. यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी टीका टिप्पणीचे राजकारण न करता विकासाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे विरोधकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
चौकट
आ. प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागु लागले आहेत. यामुळे मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा आता अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे.यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आ. प्रा. राम शिंदे आणि खा. डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेली रस्त्यांची कामे :
1) जामखेड जमादारवाडी सारोळा खुरदैठण गुरेवाडी धोंडपारगांव रस्ता प्रजिमा -१०६ कि.मी ०/०० ते ३/०० मध्ये रूंदीकरण व सुधारणा करणे
ता.जामखेड जिल्हा अहमदनगर (भाग जामखेड ते सारोळा) एकुण निधी - ३०० लक्ष
2) चौंडी आघी जवळा ते जिल्हा हदद रस्ता प्रजिमा १०३ किमी. १०/७०० ते १२/०० मध्ये सुधारणा करणे. ता.जामखेड जिल्हा अहमदनगर
(भाग जवळा गांव ते मुंजेवाडी फाटा ) एकुण निधी - २०० लक्ष
3) रा मा - ६८ भाम्बोरा दुधोडी बेर्डी देऊळवाडी सिध्दटेक पवारवाडी जलालपूर रस्ता प्रजिमा - १११ कि.मी ८/६००
ते १०/००० व ११/८०० ते १३/२०० मध्ये सुधारणा करणे ता.कर्जत (भाग दुधोडी ते बर्डी , नवलेवस्ती ते सिध्दटेक ) एकुण निधी - २०० लक्ष
4) आष्टी डोणगांव अरणगांव फक्राबाद नान्नज सोनगांव खर्डा रस्ता रामा-४०९ किमी ७/०० ते १०/०० - एकुण निधी - १०० लक्ष.
5) रामा-५४ राशिन अळसुंदे निंबे खातगाव लोणी मसदपुर चापडगांव ते प्ररामा - ८ रस्ता प्रजिमा १०१ कि.मी ०/००० ते १८/००० ते १८/१००मध्ये सुधारणा करणे.ता.कर्जत (भाग अळसुंदा गावाजवळ) एकुण निधी - २०० लक्ष
No comments:
Post a Comment