अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे कर्जतमध्ये शानदार उद्घाटनसमाजाला दिशा देण्याचे काम साहित्यिकांकडून होते - आ.रोहित पवार - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३

Home ठळक बातम्या राजकीय अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे कर्जतमध्ये शानदार उद्घाटनसमाजाला दिशा देण्याचे काम साहित्यिकांकडून होते - आ.रोहित पवार

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे कर्जतमध्ये शानदार उद्घाटनसमाजाला दिशा देण्याचे काम साहित्यिकांकडून होते - आ.रोहित पवार

शुक्रवार, फेब्रुवारी १०, २०२३ ठळक बातम्या, राजकीय,

जामखेड प्रतिनधी-१०फेब्रुवारी
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या विद्यमाने आयोजित, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेचे ४ थे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा उद्घाटन समारंभ पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार ज्ञानमंडप, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी ९ वाजता राजन लाखे व मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले.या संमेलनाचे उद्घाटन 'नाळ' मराठी चित्रपटातील बालकलाकार चि. श्रीनिवास पोकळे याच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन सत्राला स्वागताध्यक्ष आमदार रोहित पवार, संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे, कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषाताई राऊत, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, कर्जतच्या गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे व अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या कार्यकारिणीचे उपाध्यक्ष विलास रासकर, सहकार्यवाहक भरत सुरसे, विनोद वाघ, मीरा शिंदे, कविता मेहंदळे, सीमा चव्हाण, विश्वनाथ भुजबळ, विजय जगताप यांच्यासहित कर्जत शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ, कर्जत जामखेड तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.


अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी साहित्याची गोडी व प्रगल्भता वाढविणे हा संमेलनाचा उद्देश असून न. म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. आजपर्यंत शेगाव, महाबळेश्वर. पुणे येथे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलने पार पडली आहेत. ९ फेब्रुवारीपासून कर्जतला हे संमेलन संपन्न होत आहे. विद्येचे धन मुलांपर्यंत पोहोचविण्याचे काम या संमेलनांमधून होत आहे.


संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी संमेलन भरविण्याचा मुख्य उद्देश कथन केला. शालेय काळ हा सर्वांगसुंदर असतो. लहानपणापासूनच गोष्टी ऐकायला मुलांना आवडतात. घरातील आई-वडील, आजी-आजोबा यांच्याकडून गोष्टींच्या माध्यमातून मुलांवर संस्कार होत असतो. एकलव्याच्या गोष्टींमधून आपल्याला गुरुंचा आदर कसा केला पाहिजे हे लक्षात येते. निश्चय केला तर विजयापासून आपणास कोणीही रोखू शकत नाही. शिक्षण घेताना अडचणी येतील परंतु त्यावर मात करण्याची ताकद विद्यार्थ्यांनी ठेवायला हवी. समाजाला दिशा देण्याचे काम साहित्यिकांकडून होत असते. कर्जतच्या मातीत संस्कार आहेत हे अखिल भारतीय महिला कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून कर्जतकरांनी दाखवून दिले आहे. कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व शाळेतील मुलांना हे संमेलन अनुभवता यावे हा उद्देश ठेवूनच अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याने सर्वांनी संमेलनाचा मनसोक्त आस्वाद घेण्याचे आवाहन केले.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी लिखित स्वरुपातील अध्यक्षीय मनोगत स्वतःच्या कवितांसह संमेलनात मांडले. सध्याच्या काळात मोबाईल कंपनी तुमच्या हातात मोबाईलचे खेळणे तुम्हाला देऊन तुमचे खेळणे करीत आहे. विकासाचे साधन म्हणून तुम्ही मोबाईलचा वापर कराल तरच मोबाईल चांगला ठरू शकेल, परंतु करमणूकीसाठी जर मोबाईल जर मोबाईल हाताळत असाल तर मोबाईल तुमची हत्या केल्याशिवाय राहणार नाही. हातातील यंत्रे, रिमोट आणि मोबाईलमुळे नव्या पिढीचा घात होतो आहे. खेळणे म्हणून दिलेली ही साधने आत्मघातकीपणाची ठरत आहेत. माहितीमुळे मुले सजग होऊ शकत नाहीत, त्याकरिता त्यांच्यामध्ये सर्जनशीलता विकसित करणे गरजेचे आहे, हेच काम बालसाहित्य संमेलने करत असतात. मुलांच्या शारीरिक पालनपोषणाची आपण काळजी घेतो पण मनाच्या भरण पोषणाकडे आपण लक्ष देत नाही. जन्माला येण्याअगोदर गर्भसंस्कार करतोत, पण जन्मल्यानंतर आपण त्याच बालकाकडे जास्त लक्ष देत नाहीत. बालकांना पाळणाघरात ठेवतो, अशी पाळणाघरे वाढली तर पुढच्या पिढ्यांमध्ये असंख्य वृद्धाश्रमेही वाढू लागतील. म्हणून मुलांच्या मनावरील पालन पोषणाकरिता बालसाहित्याची गरज आहे. मुलांच्या मनाचे पालन पोषण टिकवायचे असेल तर बालसाहित्याशिवाय पर्याय नाही. आजी आजोबांची जागा बालसाहित्य भरू शकते. याप्रसंगी त्यांनी 'शेतामधी माझी खोप, एकुलती एक लाडाची लेक' या कविता सादर केल्या.

आमदार रोहितदादा पवार, ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव, राजन लाखे, डॉ. संगीता बर्वे, नगराध्यक्षा उषाताई राऊत, प्राचार्य डॉ. संजय नगरकर या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले निबंध स्पर्धा बक्षीस वितरण व साहित्य संमेलन निबंध स्पर्धा बक्षीस वितरण शांताबाई शेळके व्यासपीठावर संपन्न झाले. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आभार संमेलनाचे संयोजक व दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी मानले.या संपूर्ण ४ थे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे संयोजन कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे व्यवस्थापक धनंजय ठाकरे व सर्व कोअर कमिटी सदस्यांनी केले आहे. त्यांना जामखेड कर्जत मधील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले आहे.
Tags # ठळक बातम्या # राजकीय
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय
Posted at शुक्रवार, फेब्रुवारी १०, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels ठळक बातम्या, राजकीय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

जामखेड येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ: औंढा नागनाथमध्ये धक्कादायक घटना;गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गीते, व अक्षय आठवले यांनी केली मारहाण

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *