जामखेड प्रतिनिधी : १३ फेब्रुवारी
जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर यांना त्याचेवर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना श्रीगोंदा जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती हाती आली आहे. त्यानुसार त्यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
डाॅ. भगवान मुरुमकर यांना अंदूरे कुटुंबीयांच्या वतीने दाखल खंडणी व शासकीय कामात अडथळा आणने अशा विविध गुन्हयात नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यानुसार आज दि. १३ फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा जिल्हा न्यायालयाने त्यांना या दोन्ही गुन्हात जामीर मंजूर केला आहे. तर जिवे मारण्याचा प्रयत्न या कलमाखाली दाखल झालेला ३०७ हा गुन्हा सिद्ध झाला नसल्याचीही माहिती समजली आहे. या प्रकरणात ॲड. जाधवर यांनी न्यायालयात बाजू मांडली.
No comments:
Post a Comment