पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १४ फेब्रुवारी
कर्जत-जामखेडच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने भारतीय जनता पक्षाचे जामखेड तालुका सरचिटणीस लहु शिंदे व आरणगावचे सरपंच अंकुश शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ३ कोटी २२ लाख २३५ रुपये निधीच्या विविध विकास कामांना मंजूरी मिळाली आहे.
ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था . वीज, पाणी, यासंबंधीचे गावा अंतर्गत नियोजन करून ग्रामस्थांना विविध सुविधा पुरवणेसाठी राज्य शासन, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद यांच्या निधीतून विविध विकास कामे मंजूर करून घेऊन त्याची अंमलबजावणी करणे होय.
जामखेड तालुक्यातील अरणगावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूपच बिकट होता. हा बिकट तितकाच गावासाठी महत्वाचा ठरत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे. यासाठी आ. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत तरडगाव ते अरणगाव या पाणीपुरवठा योजनेसाठी २ कोटी ६६ लाख ६५२३५ रूपये मंजूर झाले आहेत. या अंतर्गत आरणगावसाठी पाण्याची टाकी, मेन लाईन HDP पाईप, वितरण व्यवस्था, सर्व वस्त्यांना पाईप लाईन करणे ही कामे करण्यात येणार आहेत.
आमदार प्रा. राम शिंदे यांचे माध्यमातून मंजूर करण्यात आलेली इतर कामे
१) दलीतवस्ती सुधार योजनेतंर्गत बौद्धविहार साठी १३ लाख रुपये
२) वामनभाऊ मंदिरासाठी सभामंडप १० लाख रुपये
३) खामगाव ते अरणगाव खडीकरण १० लाख रुपये
४) अंगणवाडी क्र १ साठी ९ लाख ७५ हजार रुपये
५) २५/१५ गाव आंतर्गत सिमेंट क्रॉकिट करणे १० लाख रुपये
६) जि प प्राथमिक शाळा डिजीटल करणे २ लाख ६० हजार रुपये.
असा मोठा विकास निधी अरणगावच्या विकासासाठी सरपंच अंकुश शिंदे व भाजपा जामखेड तालुका सरचिणीस लहुजी शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे. हा निधी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मुळे प्राप्त होणार आहे. या कामासाठी सरपंच अंकूश शिंदे यांचे उपसरपंच आप्पासाहेब राऊत, सदस्य ॲड. संजय पारे, डॉ. सिताराम ससाणे, रमजान शेख, गाहिनाथ डमाळे व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त केले जात आहेत.
No comments:
Post a Comment