पोलीस वारंट न्यूज नेटवर्क : १४ फेब्रुवारी
ऐतिहासिक व पर्यटन विकासाच्या माध्यमातून व विविध निधीतून
खर्डा परिसरातील कामे दर्जेदार व्हावीत याकडे आ. रोहित पवार यांचे कटाक्षाने लक्ष असते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंजूर केलेल्या ऐतिहासिक खर्डा किल्ला ते जामखेड रस्त्या व कौतुका नदीवरील पूलाच्या नवीन कामानां कार्यकर्त्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदारास कामाच्या दर्जा चांगल्या पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या.
आ. रोहित पवार हे खर्डा येथील कार्यक्रमास व सांत्वन भेटीसाठी आले असता त्यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधत विविध ठिकाणी भेटी दिल्या. खर्डा किल्ला ते जामखेड रस्ता हा रस्ता चार पदरी होत असल्याने या भागातील वाहतुकीचा प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लागणार आहे. तसेच येथील कौतुका नदीवरील पूल हा अनेक वर्षाचा जुना पुल होता. त्याची अवस्था दयनीय व जीर्ण झाली होती. त्यामुळे तो नवीन होणे गरजेचे होते. त्यासाठी आवश्यक असलेला निधी आ. रोहित पवार यांनी मंजूर केला आहे. यातून या रस्त्याच्यामध्ये रस्ता दुभाजक करण्यात येणार असून त्यामध्ये झाडे लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या कामामध्ये आणखी वेगळा निधी टाकून लाईटची व्यवस्था करण्यात येणार असल्याने या कामामुळे खर्डा शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. हा रस्त्या व पुलाच्या कामामुळे खर्डेकरांनी आ. रोहित पवार यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी आ. रोहित पवार यांच्या समवेत सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, ग्रा.सदस्य प्रकाश गोलेकर, वैभव जमकावळे, सामजिक कार्यकर्ते पत्रकार दत्तराज पवार, कपिल लोंढे, हरी गोलेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment