आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश; कर्जत-जामखेडचा सीसीटीव्ही प्रकल्प मार्गी, निविदा प्रक्रिया राबवण्यास गृहमंत्र्यांची मान्यता - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

गुरुवार, १६ मार्च, २०२३

Home ठळक बातम्या राजकीय आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश; कर्जत-जामखेडचा सीसीटीव्ही प्रकल्प मार्गी, निविदा प्रक्रिया राबवण्यास गृहमंत्र्यांची मान्यता

आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश; कर्जत-जामखेडचा सीसीटीव्ही प्रकल्प मार्गी, निविदा प्रक्रिया राबवण्यास गृहमंत्र्यांची मान्यता

गुरुवार, मार्च १६, २०२३ ठळक बातम्या, राजकीय,
पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१६ मार्च
कर्जत आणि जामखेड या दोन्ही शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यास उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. याबाबतची घोषणा त्यांनी आज विधानसभेत केली. वाहतुकीचा भंग करणे, चोरी, महिला आणि मुलींची छेडछाड यासह इतर गुन्ह्यांना आळा घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्जत आणि जामखेड या दोन्ही शहरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. तसेच उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करण्याचीही विनंती तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ५ डिसेंबर २०२२ रोजी केली होती. त्यानुसार २२ जुलै २०२२ रोजी अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्याचे निश्चित करण्यात आले. 

त्यानंतर २२ सप्टेंबर २०२२ मध्ये या प्रस्तावासंदर्भात अप्पर पोलिस महासंचालकांनी गृह विभागाच्या वायरलेस विभागाकडे पत्रव्यवहारही केला होता. त्यानुसार कर्जत-जामखेडमध्ये सीसीटीव्ही बसविण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली आणि त्यासाठी निधीही दिला होता.  

दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती उठवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. तसेच अंदाजपत्रकारील चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यानीही ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली आणि कोणताही भेदभाव न करता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या कामावरील स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही स्थगिती उठवून निविदा प्रक्रिया राबवण्यास मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणा अंदाजपत्रकावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी विधानसभेत  केली. त्यामुळे कर्जत जामखेड शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही प्रकल्प राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्जत-जामखेड येथील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ६.३७ कोटी रुपये मंजूर असून लवकरच निविदा पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यानुसार कर्जतमध्ये ४९ ठिकाणी तर जामखेडला ७१ ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.


प्रतिक्रिया

मतदारसंघात सामान्य नागरिक, महिला आणि व्यापारी सुरक्षित रहावेत, व्यापारी आणि व्यावसायिकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कर्जत व जामखेड शहरात सीसीटीव्ही लावण्यासाठी माझे प्रयत्न सुरु होते. मविआ सरकारने हा प्रस्ताव मंजूर करून निधीही दिला होता. परंतु या सरकारने निविदा प्रक्रिया राबवण्यास त्याला स्थगिती दिली होती. ती उठवण्याची विनंती मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना केली होती. तसेच अजितदादा यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत मतदारसंघाच्या वतीने मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मा. अजितदादा तसेच सर्व अधिकारी यांचे आभार मानतो.

- आमदार रोहित पवार, 
(कर्जत-जामखेड विधानसभा) 


चौकट

कर्जत-जामखेड होणार अधिक सुरक्षित
गेल्या तीन वर्षांत आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात खर्डा आणि मिरजगाव या दोन नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी आणली आणि या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देऊन कामकाजालाही सुरवात झाली. तसेच कुसडगाव या ठिकाणी एसआरपीएफचे सेंटर सुरु केले. यामुळे मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यास मोठी मदत झाली. नागरीक मुक्त वातावरणात राहू लागले. आता सीसीटीव्ही प्रकल्पामुळे त्यात आणखी सुधारणा होऊन नागरिकांना निर्भय वातावरणात काम करता येणार आहे.
Tags # ठळक बातम्या # राजकीय
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय
Posted at गुरुवार, मार्च १६, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels ठळक बातम्या, राजकीय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!
    जामखेड प्रतिनिधी / ५ ऑक्टोबर २०२५ आष्टी तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून उचलून तिच...
  • जामखेड रस्त्यावर भीषण अपघात; कुत्रे आडवे आल्याने जीप उलटली, तीन जण जखमी
    जामखेड प्रतिनिधी/६ऑक्टोबर२०२५ जामखेड रस्त्यावर काल रविवारी दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडलेल्या अपघातात जीप उलटल्याने तीनजण ग...
  • जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा; सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण
    जामखेड प्रतिनिधी/५ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतन, राहणीमान भत्ता आणि भविष्य निर्वाह निधी थ...
  • अत्यंत दु:खद! आदर्श शिक्षक व साहित्यिक गोकुळ गायकवाड यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू
    जामखेड प्रतिनिधी/6 ऑक्टोबर2025 तालुक्यातील आदर्श प्राथमिक शिक्षक, साहित्यिक ,बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड यांचा मुलगा अविष्कार (सो...
  • खर्डा परिसरात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला– रहस्यमय घटनेचा तपास सुरू, परिसरात एकच खळबळ
    खर्डा प्रातिनिधी/१३ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाणे हद्दीतील माळेवाडी शिवार परिसरात आज (दि.13 ऑक्टोबर 2025) दु...
  • जिल्ह्यातील अवैध धंद्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा आळा – संगमनेर-मिरजगाव-लोणी परिसरात अवैध धंद्यावर धडक!दोन दिवसांत 9 ठिकाणी छापे – 12 आरोपी अटक, 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त
    आहिल्यानगर प्रतिनिधी/५ऑक्टोबर२०२५ आहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर मोठा धडक बसवत संगमनेर शहर, मिरजगाव व लोणी पोलि...
  • ब्रेकिंग न्यूज:जामखेडमधील कलाकेंद्र तोडफोड प्रकरण उघडकीस – एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे जप्त, 7 आरोपी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांची धडाकेबाज कारवाई
    जामखेड (प्रतिनिधी) :/13ऑक्टोबर 2025 जामखेड येथील रेणुका कलाकेंद्रावर झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने वेग...
  • "जामखेडमध्ये गांजा विक्रीचा मोठा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, नितीन-पवार दांपत्याला ताब्यात!"
    जामखेड प्रतिनिधी/१०ऑक्टोबर२०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड शहरात मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीप...
  • "जामखेडमध्ये कामगारांचे मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद — स्थानिक गुन्हे शाखेची शानदार कारवाई!"
    जामखेड प्रतिनधी/१० ऑक्टोबर२०२५ जामखेड शहरातील कामगारांचे मोबाईल चोरणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत जेरबंद झाले आ...
  • खर्डा ग्रामस्थांचा उद्या सबस्टेशनवर हलगी मोर्चा – शहरात दोन दोन दिवस लाईट बंद, सततच्या वीज खंडितीविरोधात संताप
    खर्डा  :13ऑक्टोबर 2025 खर्डा शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्मा...

Popular Posts

खा. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध, दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत स्कूल व्हॅन सेवेचा शुभारंभ संपन्न

खर्ड्यात श्रावण रूद्रपूजा, कीर्तन व महाप्रसाद सोहळा भव्य उत्साहात संपन्न

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पदवीधर विधान परिषदेसाठी पदवीधर मतदारांनी शांततेत मतदान करावे - सपोनि. प्रकाश पाटील

आ. राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, चौंडीतील धनगर आंदोलन स्थगित

श्री शिवप्रतिष्ठान व खर्डा ग्रामस्थांच्या मागणीला यश ; किल्ल्याच्या सौंदर्यास बाधा ठरणारे जनसुविधा केंद्राचे होत असलेले काम थांबवुन इतरत्र ठिकणी सुरू होणार

खर्डा जि.प.प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाची धामधुम,वार्षिक स्नेह संमेलनातून कलागुणांना मिळाली प्रगतीची वाटचाल

अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी

खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी

खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत मागील अनेक महिन्यांनपासून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *