पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१६ मार्च
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा पोलीस स्टेशनचा पदभार घेतलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांचा खर्डा भारतीय जनता पार्टी खर्डाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच खर्डा शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
खर्डा शहर हे या परिसरातील ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेले व पर्यटनाच्या माध्यमातून महत्वाचे असे शहर आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर केले. अलिकडेल काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या पोलीस स्टेशनला असलेले पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या झालेल्या बदलीनंतर आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांचा खर्डा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा नेते नानासाहेब गोपाळघरे, खर्डा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच भागवत सुरवसे, युवक कार्यकर्ते बाजीराव गोपाळघरे, गणेश शिंदे, बाळासाहेब गोपाळघरे, गोटु कांबळे, टिल्लू पंजाबी, भास्कर गोपाळघरे, भरत होडशिळ, नामदेव गोपाळघरे, शाम सकट, आदि भाजपा कार्यकर्त्यांसह पोलीस काॅन्स्टेबल संभाजी शेंडे, पोलीस काॅन्स्टेबल शशी मस्के व खर्डा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment