पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २४ मार्च
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खर्डा शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडली असल्याचे समोर आले असून या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी तातडीने कारवाई करत विनयभंग व पोक्सोसारखे गंभीर गुन्हे दाखल करत आरोपीस तात्काळ अटक करण्याची कारवाई केली आहे.
सविस्तर असे की, या घटनेतील अल्पवयीन पिडीता ही कॉलेज सुटल्यानंतर पायी चालत जात असताना आरोपी रोहित विनोद डाडर रा.अण्णाभाऊ साठे चौक, खर्डा हा तिचे पाठीमागे पायी चालत येऊन पिडीतेस डोळ्याने इशारा करून निघून गेला होता. तसेच पिडीता ही भाजीपाला खरेदी करणे करिता गावातील बाजारात जात असताना तीच्या त्यांचे पाठीमागे चालत जाऊन पिच्छा करत घरासमोर आल्यानंतर तीला इशारा करून तुझे फोटो माझ्याकडे आहेत. तू माझ्यासोबत बोलली नाही तर ते मी व्हायरल करील अशी धमकी दिली आहे. यानुसार अल्पवयीन पिडीत फिर्यादी हिने दिलेल्या फिर्यादीवरून रोहित विनोद डाडर रा.अण्णाभाऊ साठे चौक खर्डा ता.जामखेड याचे विरुध्द
गुन्हा रजि.नं. 70/2023 भादवि. कलम 354(ड), 506, पोक्सो कलम 11 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस त्वरीत अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार दि. २७/६/२०२२ रोजी दुपारी १२ : ३० ते व २३ /३/२०२३ रोजीचे दुपारी १: ०० वाजताचे सुमारास खर्डा गावामध्ये घडला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.
No comments:
Post a Comment