पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२४मार्च
क्षय रोग हाएक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आज पूर्ण बरा होणारा आजार आहे.एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई.सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते.हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो.त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो.यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे.इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.यासाठी तरुणांनी सजग राहून क्षयरोग निवारणासाठी पुढे यावे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशांक वाघमारे यांनी केले.जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने स्नेहालय स्नेहसक्षम प्रकल्प अहमदनगर,ग्रामीण रुग्णालय जामखेड,१७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.व टी.बी.विभाग जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग निवारण शिबीर प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जामखेड शहरातून जाणीव जागृती रॅली काढण्यात आली.यावेळी वैदयकीय अधिक्षक डॉ.शशांक वाघमारे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे,स्नेहालय जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले,डॉ.युवराज खराडे यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला.यावेळी डॉ.किशोर बोराडे यांनी घोषवाक्याचे उद्बोधन केले.यावेळी विचार मंचावर प्राचार्य बी.के.मडके,उपप्राचार्य पी.ए.तांबे,पर्यवेक्षक व्ही.के. कोकाटे,अधिपरीचारका लतिका सातपुते,दादासाहेब खाडे,एन.सी.सी.ऑफिसर प्रा.गौतम केळकर,प्रा.अनिल देडे,प्रा.मयूर भोसले,मजहर खान,अरुण घुंगरट उपस्थित होते.
यावेळी जामखेड शहरातून जाणीव जागृती रॅली काढण्यात आली.यावेळी वैदयकीय अधिक्षक डॉ.शशांक वाघमारे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे,स्नेहालय जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले,डॉ.युवराज खराडे यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला.यावेळी डॉ.किशोर बोराडे यांनी घोषवाक्याचे उद्बोधन केले.यावेळी विचार मंचावर प्राचार्य बी.के.मडके,उपप्राचार्य पी.ए.तांबे,पर्यवेक्षक व्ही.के. कोकाटे,अधिपरीचारका लतिका सातपुते,दादासाहेब खाडे,एन.सी.सी.ऑफिसर प्रा.गौतम केळकर,प्रा.अनिल देडे,प्रा.मयूर भोसले,मजहर खान,अरुण घुंगरट उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ.वाघमारे म्हणाले की; ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला,थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे,वजन कमी होणे, भूक मंदावणे,हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे,रात्री घाम येणे इ.लक्षणे दिसून आल्यास त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे,स्वच्छता बाळगणे जरूरीचे असते अशी माहिती देत क्षयरोग व एच.आय.व्ही/एड्स वर जाणीव जागृती निर्माण करूया अशी सादही त्यांनी तरुणाईला घातली.यावेळी आय.सी.टी.सी.समुपदेशक सुप्रिया कांबळे,गट प्रवर्तक सुवर्णा हजारे,रेखा अवसरे,तालुक्यात आरोग्य विषयी काम करणारे आशा स्वयंसेविका
तसेच महाविद्यालायचे सर्व विध्यार्थी-विध्यार्थिनींसह एन.सी.सी.कॅडेट,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून रॅलीय सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश अब्दुले यांनी केले तर प्रस्ताविक अरुण घुंगरट,आभार दादासाहेब खाडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन बेग,हवा बाबा घायतडक,अरुण घुंगरट,मोहित कदम,अक्षय होडशीळ यांनी विशेष परिश्रम घेतले.१७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष,एडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल रणदीप सिंग यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले.
खूप छान
ReplyDelete