पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -६ फेब्रुवारी
शेकडो वर्षांची परंपरा असलेला कानिफनाथ यात्रा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला, दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात कर्जत जामखेड मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार
आ. रोहित पवारांनी अचानक लावलेली हजेरी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करून गेली तर
आ. रोहित पवार यांच्या उपस्थिती बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व यात्रा उत्सव समितीच्या वतीने आ. रोहित पवार यांचा केलेला सन्मान पुन्हा एकदा त्यांची लोकप्रियता अधोरेखित करून गेला. यात्रेतील काठ्या फिरवण्याचा जो मान असतो त्याचाही सन्मान राखत स्वतः कानिफनाथ मंदिरावर चढून काठ्या फिरवल्या, तसेच या उत्सवाच्या जल्लोषमय व उत्साहाच्या वातावरणात स्वतःला सामील करून नाच करत वाद्यांवर ठेकाही धरला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यावेळी खर्डा गावचे सरपंच आसाराम गोपाळघरे, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, दीपक जावळे,वैभव जमकावळे महालिंग कोरे, भीमा घोडेराव व पत्रकार श्वेता गायकवाड यांच्या समवेत भाविक भक्त, नागरिक व राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच कालच नव्याने रुजू झालेले खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी महिला सुरक्षतेची काळजी घेतली. अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी बजावल्याने गेट पासून ते मंदिरापर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. एकंदरच कानिफनाथ यात्रा उत्सव शांततेत व आनंदात पार पडला.
No comments:
Post a Comment