पोलीस वारंट न्यूज नेटवर्क ६ फेब्रुवारी
माझ्याकडे पाहून विद्यार्थ्यांना आयपीएस होण्याची प्रेरणा मिळाली यापेक्षा माझा मोठा सन्मान कोणताच नाही - पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड
जामखेडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांची पारनेर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या कार्याला नागेश व कन्या विद्यालय वतीने विद्यार्थी व शिक्षक यांनी सल्यूट देऊन सन्मान करण्यात आला तसेच कमिटीच्या वतीने फेटा घालून पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर ,स्कूल कमिटी सदस्य विनायक राऊत ,प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के डी, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के पर्यवेक्षक संजय हजारे ,गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे ,आंधळे बी एम, रमेश बोलभट,संतोष सरसरमक , एनसीसी विभाग प्रमुख मयुर भोसले, शिंदे बी एस , निलेश अनारसे, म्हस्के मॅडम, बडे एस डी नागेश व कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी जामखेड मध्ये अतिशय उत्कृष्ट काम केले. तसेच आपल्या कार्यातून नवीन ओळख निर्माण केली व सर्व विद्यार्थ्यांना हवेसे वाटणारे अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थिनी साठी भरोसा पेटी बसवण्यात आली व रोड रोमिओनचा बंदोबस्त करण्यात आला व नियमित विद्यालयाला मार्गदर्शन केले त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून नागेश कन्या विद्यालय वतीने सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी त्यांना मानाचा सॅल्यूट दिला व सन्मान केला.
शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
शिंदे बी एस, बडे सर, मस्के मॅडम, सासणे एस आर, निलेश अनारसे यांनी मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनींनी संभाजी गायकवाड साहेब यांच्याकडे बघितल्यावर आम्हाला आयपीएस होण्याची इच्छा आहे असे मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य मडके बी के यांनी मनोगत मध्ये विद्यालयाच्या अडीअडचणीला साहेब नेहमीच धावून येत असतात व एक फोन केला की मदत करत असतात, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विद्यालयामध्ये भरोसा पेटीचे अनावरण साहेबांच्या हस्ते झाले आहे, रोड रोमन चा बंदोबस्त केला गेला आहे त्यांच्या कार्याला आमचा सलाम व पुढील कार्यास शुभेच्छा
स्कूल कमिटी सदस्य विनायक राऊत त्यांनी मनोगत मध्ये गायकवाड साहेब व्यक्तिमत्व बहुआयामी आहे, सर्व क्षेत्रांमध्ये कार्य चांगले आहे तसेच जामखेड मध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. हे जनतेचे समरूप झाले आहेत.
पुढील काळात पदोन्नती घेऊन कर्जत जामखेड किंवा नगर जिल्ह्यामध्ये यावे असे शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मनोगत मध्ये मी जामखेड चा कार्यभार स्वीकारला त्यावेळेस पहिला माझा सन्मान नागेश विद्यालय ने केला व कार्यकाळ संपतानाही शेवटचा सन्मानही नागेश विद्यालय ने केला रयतचे माझे नाते वेगळेच आहे कर्मवीर अण्णांचा विचाराचा माझ्यावर प्रभाव आहे. विद्यार्थ्यांनी माझ्या पेक्षाही मोठमोठ्या प्रशासकीय पदावर जावे त्यांना मी सॅल्यूट कररताना गर्व वाटेल . लोकांमध्ये मिसळून लोकांमध्ये काम करण्याची पद्धत चांगली यशस्वी झालेले आहे. माझ्याकडे पाहून विद्यार्थ्यांना आयपीएस होण्याची प्रेरणा मिळाली यापेक्षा माझा मोठा सन्मान कोणताच नाही असे मनोगत व्यक्त केले.
सन्मान पाहून संभाजी गायकवाड साहेब बोलताना भावनिक झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ बेलेकर यांनी गायकवाड साहेबांनी जामखेड मधील गुंडा गर्दि, सवकारकी याला आळा घातला तसेच पोलीस एक फोन केला की जनतेच्या मदतीला येत होते, जीवाची परवा न करता ड्युटी करत आहे , विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचललेली आहेत असे मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
शेवटी सर्व नागेश कन्या विद्यालय शिक्षक विद्यार्थी यांनी संभाजी गायकवाड यांना सॅल्यूट देऊन कार्याचा सन्मान करून निरोप दिला.
No comments:
Post a Comment