पोलीस वारंट न्युज नेटवर्क :३१ मार्च
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे जन्मोत्सव, अभिषेक, शोभा यात्रा व महाप्रसाद अश्या विविध कार्यक्रमांनी राम नवमी उत्सव साजरा करण्यात आला.
सालाबाद-प्रमाणे यावर्षी खर्डा येथील राम मंदिरमध्ये श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरमध्ये मनमोहक सजावट करण्यात आली होती. दरम्यान दुपारी १२ वाजता श्रीराम मूर्तीला अभिषेक करून तसेच पाळणा गाऊन प्रभू श्रीराम जन्मोउत्सव साजरा करण्यात आला.
त्या नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. तर सायंकाळी ६ वाजता शोभायात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेत रथ मध्ये श्रीराम ची मूर्ती ठेवण्यात आली होते. गावातील प्रत्येक घरासमोर सडा-रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, शशी मस्के व पोलीस कर्मचारी यांनी प्रत्येक्ष उपस्थित राहून सर्वांनी पालखी पूजन केले. या वेळी गावातील भाविक भक्तांनी या शोभा यात्रेत उत्साने भाग घेतला.

या संपुर्ण कार्यक्रमात अखंड हिंदू समाज शिवपट्टण व
आय लव्ह शिवपट्टण तसेच सर्व पक्षीय सर्व हिंदू संघनटना व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता .शोभा यात्रेसाठी खर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
No comments:
Post a Comment