पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ३१ मार्च
ग्रामीण भागातील जनतेला आधार कार्ड बाबत येणाऱ्या अडचणीची सोडवणूक गावातच करून त्यांना आधार द्यावा यासाठी भारतीय डाक विभाग कर्जत व चोभेवाडी- बह्राणपूर
ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने राम नवमी चे औचीत्य साधून ३० मार्च २०२३ रोजी चोभेवाडी-बह्राणपूर (नान्नज ता. जामखेड) येथे आधार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आधार शिबिराचे उद्घाटन कर्जत उपविभागाचे उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख व चोभेवाडीचे सरपंच महादेव खोटे आदी मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जनक सावंत, राजाभाऊ वाळुंजकर, जालिंदर वाळुंजकर, प्रवीण पोते, सोनु बळे आदी उपस्थित होते.
यावेळी नवीन आधार कार्ड काढणे, बाल आधार, आधार दुरुस्ती, आधार कार्ड ला मोबाईल लिंक करणे, प्रधानमंत्री किसान योजना, मातृवंदना योजना, स्कॉलरशिप योजना इत्यादी सेवांचा लाभ चोभेवाडी, बुह्रानपुर, मतेवाडी, जवळके येथील नागरिकांनी घेतला.
यावेळी नान्नज चे पोस्ट मास्तर बळी जायभाय, डाक आवेक्षक बापूराव पंडित,क्षितीजा दाणी, परवीन पठाण, गणेश हजारे, सुनील हंबीरराव आदी चे सहकार्य लाभले.यावेळी विविध डाक सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन डाक विभागा मार्फत कर्जतचे पोस्ट मास्तर बाळराजे वाळुंजकर यांनी केले.
No comments:
Post a Comment