पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २८ एप्रिल
जामखेड तालुक्यातील मोहा शिवारातील हापटेवाडी येथील बाळु भानुदास हापटे या ४५ वर्षीय व्यक्तीने
मोहा गावचे शिवारातील हापटेवाडी शेत गट क्रमांक नंबर ५८१ मधील शेताचे बांधावरील लिंबाचे झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी ८:१५ पुर्वी उघडकीस आली आहे. यानुसार खबर देणारे वैजीनाथ आजीनाथ हापटे यांनी दिलेल्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मृतदेहाचा पंचनामा करताना मयत बाळु भानुदास हापटे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यानुसार पोलीस कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत असल्याने त्यानुसार फिर्याद घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment