पोलीस वारंट न्यूज नेटवर्क- २८ एप्रिल
जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे आज दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास अचानक वादळ व गारांचा पाऊस सुरू झाला. दरम्यान काही समजण्याच्या आतच आपल्या गट नंबर २३ मधील शेतात गुरे चारत असताना व त्यांच्यासाठी चारा कापत असलेल्या ६५ वर्षीय शेतकरी भिमराव बाजीराव दगडे रा. दिघोळ यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना समजताच दिघोळचे सरपंच नानासाहेब गिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सदर ठिकाण जाऊन मयत भिमराव बाजीराव दगडे यांचा मृतदेह जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. तर महसूल विभागाच्या वतीने सदर घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment