पोलीस वारंट न्यूज नेटवर्क : १ मे
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनच्या प्रांगणात खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर तर ग्रामपंचायत येथे सरपंच नमिता आसाराम गोपाळघरे यांच्या हस्ते धवजारोहन करण्यात आले.
दि. १ मे हा महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे नवीन झालेल्या वेअर हाऊस मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी खर्डा पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलीस निरीक्षक महेश जानकर, संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड, स्टोर सुप्रिडंट संदीप ढवळे, पत्रकार अनिल धोत्रे, शेखर देशमुख, धनसिंग साळुंके, पोलीस कर्मचारी संभाजी शेंडे, बाळासाहेब खाडे,अशोक बडे , कर्मचारी नरेंद्र थोरात, विनोद गोलेकर ,तसेच विराज पाटील आण्णा इंगोले तर खर्डा ग्रामपंचायत येथे सरपंच नमिता आसाराम गोपळघरे युवा कार्यकर्ते आसाराम गोपाळघरे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, संपादिका श्वेता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे, विकास शिंदे, अशोक गीते, धनसिंग साळुंके व ग्रा.कर्मचारी उपस्थित होते.
तसेच खर्डा येथे इतरही विविध ठिकाणी शासकीय कार्यालयांमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment