पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ३० एप्रिल
जामखेड बाजार समिती मतदान प्रक्रिया संपण्याची बरोबर ४:०० वाजेची वेळ संपताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मतदान केंद्राचे गेट बंद करून आपल्या पोलीस शिस्तीचा आजच्या दिवसातील आणखी एक नमुना दाखवून दिला आहे. दरम्यान सकाळीही मतदान केंद्रावर राजकीय कार्यकर्त्यांकडून होणारा गोंधळ थांबवण्यासाठी मुंबई पोलीस अॅक्ट ३७/१, १३५ नुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यास सक्त मनाई असून कोणी हा कायदा मोडल्यास गुन्हे दाखल करणार असा इशारा देऊन तालुक्यातील मतदान केंद्रावर होणारा संभाव्य गोधळ व अनुचित प्रकार टाळण्याची चोख कामगिरी बजावली.
आज दि. ३० एप्रिल रोजी जामखेड बाजार समिती निवडणुक च्या १८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सुरू झालेली मतदान प्रक्रिया दुपारी ४:०० च्या सुमारास नियमाप्रमाणे संपत असतानाच नियमांचे काटेकोर पालन करत जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी बरोबर चारच्या ठोक्याला जामखेड शहरातील मराठी मुलांच्या शाळेत करण्यात आलेल्या मतदान केंद्रातील सर्व राजकीय नेते व कार्यकर्ते यांना बाहेर जायला सांगितले व मतदान केंद्राचे गेट बंद करून आपल्या पोलीस शिस्तीचा नमुना दाखवून दिला.
सकाळी मुंबई पोलीस अॅक्ट ३७/१, १३५ नुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यास सक्त मनाई व दुपारी बरोबर ४:०० वेळेला केलेले गेट बंद या दोन्ही अॅक्शन पाहता जामखेडला पुढील काळात जामखेडची कायदा सुव्यवस्था किती शिस्तीत येईल याचीच चर्चा सुरू असून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या या भुमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment