पोलीस वारंट न्यूज नेटवर्क : २८ एप्रिल
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी जामखेड पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन समाजातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.
रक्तदान केल्याने आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी जामखेड पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर विविध पातळ्यांवरील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच सामाजिक काम म्हणून दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. जामखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी होणाऱ्या या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment