उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही स्थगित कामे सुरू झाली नसल्याने आ. रोहित पवार यांनी घेतली पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

Home राजकीय बातम्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही स्थगित कामे सुरू झाली नसल्याने आ. रोहित पवार यांनी घेतली पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही स्थगित कामे सुरू झाली नसल्याने आ. रोहित पवार यांनी घेतली पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

गुरुवार, एप्रिल २७, २०२३ राजकीय बातम्या,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२७ एप्रिल
 कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुंबईत महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली आहे. सध्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे सीना नदीलगत सुरू असलेल्या आणि पूर्णत्वास जात असलेल्या घाटाच्या बांधकामाला अन्य ठिकाणी हलवू नये याबाबतची विनंती त्यांनी केली तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील पर्यटनवाढीसाठी विविध विकास कामे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणली होती. ती विकास कामे सुरळीत सुरू असतानाच नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने सर्वच कामांना सरसकट स्थगिती लावली. या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे  मतदारसंघातील नागरिकांनी दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यावर निर्णय देत कामांवरील स्थगिती उठवण्याचा आदेश दिला होता.

१४ मार्च रोजी माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही शासनाकडून स्थगित कामे सुरू करण्यात आली नसल्याने आमदार रोहित पवार यांनी पर्यटन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कामांना सुरू करण्यासाठी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेऊन माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कामांची स्थगिती उठवण्याची विनंती केली. ज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथील बारव, नदीकाठ घाटाचे बांधकाम, तसेच खर्डा येथील श्री संत गीते बाबा व श्री संत सिताराम बाबा समाधीस्थळ विकास यासोबतच राशीन येथील जगदंबा माता देवस्थान विकास कामे व इतर कामांचा समावेश आहे. 

यासोबतच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे सीना नदीलगत घाटाचे बांधकाम सुरू आहे. परंतु हे काम थांबवून अन्य ठिकाणी करण्यासाठी काही स्थानिक नेत्यांनी मागणी केली आहे. परंतु, जुन्या घाटास कोणत्याही प्रकारे बाधा येत नसल्याने व सध्या त्या घाटाच्या पायाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला नवीन घाट करता येईल, दोन्ही बाजूचा घाट करण्यासाठी रोहित पवारांनी पुढाकार घेतला आहे. सरकारने स्थगित केलेल्या कामांपैकी ते एक काम असल्याने एक काम ३० टक्के झाले आणि दुसरं काम स्थगित असल्याने ते सुरू होत नाही. सद्यस्थितीत हे काम तातडीने पूर्ण करण्याकरिता संबंधितांना आदेशित करावे, अशी विनंती व राशीनच्या देवीसाठी २१ कोटींचा आराखड्यातील मंजूर केलेली काम देखील स्थगितीमध्ये आहे. त्यात जो एक कोटी निधी देण्यात आला होता त्याची एजन्सीसुद्धा सरकारकडून चुकली होती ती बदलण्याची विनंतीही यावेळी मंत्री महोदयांकडे आमदार रोहित पवार यांनी केली.

दरम्यान, सद्यस्थितीत शासन निर्णयात स्थगिती देण्यात आलेल्या कामांची स्थगिती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उठवून ही कामे व त्याला मंजूर झालेला निधी याला कोणतीही बाधा न आणता सुरू करावी व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये यासाठी सहकार्य करावे अशी देखील विनंती त्यांनी केली आहे. 

प्रतिक्रिया

मी आमदार होण्यापूर्वी चौंडीला एक रुपयाचं काम सुद्धा आधीच्या पाच वर्षात झालं नव्हतं, आमदार झाल्यानंतर घाटाचं चार कोटींचं काम आपण सुरू केलं आणि ते २०% पूर्ण देखील झालंय. ते सुद्धा कदाचित मुद्दामहून थांबवण्यात आलं आणि नव्याने मोठ्या प्रमाणात आपण मंजूर केलेले कामे ज्यामध्ये घाट, संग्रहालय, भव्य कमान बांधकाम त्याला सुद्धा न्यायालयाने निकाल दिला असताना देखील सरकार काम करण्यास परवानगी देत नाही ही शोकांतिका आहे. तसेच संत गीते बाबा, संत सिताराम बाबा यांच्या समाधीस्थळ विकास व राशीनची आई जगदंबा माता देवस्थान विकास ही कामे देखील न्यायालयाने सांगून सुद्धा हे सरकार काम सुरू करत नाही. अशा पद्धतीने धार्मिक, प्रेरणास्थळांबाबत जर कोणी राजकारण करणार असेल तर त्यांना कोणीही माफ करणार नाही, आम्ही हे काम सुरू करूनच दाखवणार. 

- रोहित पवार
(आमदार - कर्जत जामखेड विधानसभा)
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at गुरुवार, एप्रिल २७, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

एसटी बसचे न येणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं, खाजगी वाहनातून प्रवास करताना टमटम पलटी, खर्डा विद्यालयातील १६ विद्यार्थी जखम, संतप्त पालकांनी खर्डा बसस्थानकाला ठोकले कुलूप

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

बनावट दारू प्रकरणी छापा जामखेड रस्त्यावर ६ जण पकडून ३१ लाखाचा ऐवज जप्त

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

ना. प्रा. राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी बिनविरोध निवडीबद्दल जामखेडमध्ये उध्या भव्य मिरवणुक

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *