पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १२ मे
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे या घटनेतील ३६ वर्षीय पिडीत महिलेला व्यवसायासाठी दिलेला गाळा रिकामा करून देण्यासाठी तिच्या घरी जाऊन तिस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून. पती सोडवण्यासाठी आला असता त्याला जातीवाचक शिवीगाळ करत दुकानातील लॅपटॉप व झेरॉक्स मशिन तोडल्याच्या कारणावरून पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गौरव श्रीराम बागडे याच्या विरूद्ध विनयभंग व अॅट्राॅसिटी अॅक्टसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळेलेल्या माहितीनुसार आरोपी गौरव श्रीराम बागडे, रा.खर्डा यांने फिर्यादी महिलेच्या झेराँक्सच्या दुकानात जावुन फिर्यादीने भाड्याने घेतलेला गाळा खाली करण्याच्या कारणावरुन फिर्यादीच्या घरात घुसुन फिर्यादीचा हात धरुन जवळ ओढुन मिठीमारुन तीची छाती दाबुन तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन फिर्यादीचा पती सोडवण्यासाठी मध्ये आला असता त्याना शिवीगाळ दमदाटी करुन व कोळ्यानो तुम्ही आजची आज माझा गाळा खाली करा अशी जातीवाचक शिवीगाळ करुन फिर्यादीच्या दुकानातील लॅपटॉप व झेरॉक्स मशीन फर्शीवरआदळुन तोडुन नुकसान केले यानुसार यातील पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गौरव श्रीराम बागडे विरोधात भा.द.वि. कलम 354,452, 323, 504, 427 अनुसुचीत जाती जमाती अत्याचार कायद कलम 3(1)(w)(i), 3(1)(w)(ii), 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. ही घटना दि. ११ मे रोजी सायंकाळी ५ : ०० वाजेच्या सुमारास खर्डा गावातील फिर्यादीच्या घरी व दुकानात घडली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव हे करत आहेत.
No comments:
Post a Comment