पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १२ मे
जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदासाठी वैजीनाथ पाटील यांची वर्णी लागावी अशी मागणी खर्डा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत असून कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापनेपासून खर्डा शहराला संधीच मिळाली नसल्याने आतातरी संधी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नेते व आ. प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व युवकांचे आशास्थान पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव प्रा. सचिन सर गायवळ यांचा सहकार्याने
नुकत्याच झालेल्या जामखेड बाजार समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पॅनलचे एकुण १८ पैकी ९ जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. या पुर्वी भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या खर्डा शहराने अहमदनगर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा पहिला जिल्हा परिषद सदस्य देण्याचे काम केले आहे. खर्डा शहर व गटात भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य राहिलेले आहे.
खर्डा येथील भाजपाचे नेते व कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवी दादा सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली खर्डा गट व शहरात भाजप पक्षाचे प्राबल्य वाढत आहे. वैजीनाथ पाटील यांना सभापती केल्यास त्यात भरच पडणार आहे. तसेच या निवडीमुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकीत पक्षाला बळच मिळणार आहे.
भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा खर्डा गटातील परंतु खर्डा शहराला आजपर्यंत न्याय मिळाला नाही. त्यामुळे वैजीनाथ पाटील यांना सभापती करून खर्डा शहरावर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी खर्डा ग्रामस्थांमधून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा