पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २ मे
ग्रामसेवकांच्या कामातील अनियमितता व गैर वर्तनणुकीचा अहवाल वरिष्ठांना पाठवल्याचा राग येऊन जामखेड तालुक्यातील पाटोदा गरड येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक बळीराम शिंदे यांनी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांना कार्यलयात येऊन आरेरावी केली व गैरशिस्तीची वर्तणुक केली व धमकी दिल्याची घटना घडली असून या विरूध्द दिलेल्या तक्रारीवरून ग्रामसेवक बळीराम शिंदे यांच्यावर भा. द. वि. कलम 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील पाटोदा गरड येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक बळीराम शिंदे
यांच्या नेहमीच्या गैरवर्तणुक व गैरकारभाराबाबत दि. २६ एप्रिल २०२३ रोजी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी वरिष्ठांना अहवाल पाठविला होता. तसेच या पुर्वी देखील अहवाल पाठविलेला आहे.
त्याचा मनात राग धरून ग्रामसेवक बळीराम शिंदे यांनी सदर गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांना कार्यलयात येऊन
बीडीओ प्रकाश पोळ त्यांच्या कार्यालयात येऊन आरे रावे केली व गैरशिस्तीचे वर्तनात करून धमकी दिली म्हणून गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामखेड पोलीस स्टेशन गु. र. नं-३००/२०२३ भादवी१८६,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संजय लोखंडे करत आहेत.
No comments:
Post a Comment