पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २६ जून
आगामी दि. २९ जून रोजी राज्यातील हिंदू बांधवांसाठी महत्त्वाची असलेली आषाढी एकादशी व मुस्लीम बांधवांचा बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने बकरी ईद दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. ३० जून रोजी साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला असल्याचे याबैठकीत जाहीर केले आहे.
खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने आज दि. २६ जून रोजी शांतता समीतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी काही मार्गदर्शक सुचनांचे पालन करून बकरी ईद सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.या शांतता कमीटीच्या बैठकीसाठी मुस्लिम समाजाती
आतीक सय्यद, राजू सय्यद, समीर कुरेशी, सब्बीर मोमीन, मोसीन कुरेशी, शाहरुख शेख, झमेर सय्यद, जहीर सय्यद,
सलीम बागवान, आरिफ कुरेशी, अल्ताफ कुरेशी, राम्मा अत्तार,
हे मान्यवर उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचना
१) सोशल मीडिया वापरत असताना आपण कुठल्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपहार्य मेसेज कोणाला पाठवू नये.
२) कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
३)बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी आल्याने उघड्यावर कुरबानी करू नये.
४)बकरे कापल्यानंतर त्यांची वेस्टेज हे उघड्यावर तसेच रस्त्याच्या कडेला न फेकता ते खड्डा करून झाकून टाकावे.
त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी होणार नाही असा निर्णय सर्वानुमते झाला आहे. तरी वरील सर्व सूचनाचे पालन करून आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण साजरे करावेत व समाजात शांतता राखावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर व शांतता समितीच्या वतीने करण्यात आले आहेत.
चौकट
आगामी दि. २९ जून रोजी राज्यातील हिंदू बांधवांसाठी महत्त्वाची असलेली आषाढी एकादशी व मुस्लीम बांधवांचा बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने बकरी ईद दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. ३० जून रोजी साजरी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment