आहिल्यानगर प्रतिनधी/११ऑगस्ट२०२५
कर्जत शहर आणि मौजे राशीन येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते.
सभापती राम शिंदे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अशा अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले.
झेंडा लावण्यावरून झालेल्या वादाबाबत दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी गावपातळीवर एकत्र येऊन तोडगा काढावा, अशीही विनंती त्यांनी केली.
प्रशासनाला सूचना
- प्रशासनाने दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधावा
- हा प्रश्न 15 ऑगस्टपर्यंत सामोपचाराने सोडवावा
- समाजमाध्यमांवरून भडकावणारे संदेश पसरू नयेत
- सायबर विभागाने दक्षता घ्यावी
- जाणूनबुजून तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, कर्जतचे उपविभागीय अधिकारी नितीन पाटील आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा