जामखेड प्रतिनधी/१३ऑगस्ट२०२५
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जामखेडमध्ये उद्या, गुरुवार १४ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन निमित्ताने व “ऑपरेशन सिंदूर सक्सेस” विजयाच्या निमित्ताने भारतीय सैन्य दलाच्या शौर्य आणि बलिदानास वंदन करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीसाठी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि सैनिकांचे मनोबल वाढवावे.रॅली सकाळी ९:३० ते १०:३० या वेळेत शासकीय विश्रामगृह, नगर रोड येथून सुरू होईल. तिचा मार्ग खर्डा कॉर्नर, तपनेश्वर रोड, धर्मयोद्धा चौक, मिलिंद नगर बीड रोड, बीड कॉर्नर, जय हिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज मेन पेठ, लक्ष्मी चौक (संविधान स्तंभ) मार्गे खर्डा चौक येथे समारोप केला जाईल. रॅलीमध्ये सर्व जाती-धर्म, विद्यार्थी, युवक, महिला, व्यापारी, पत्रकार, पोलीस, अधिकारी, स्वयंसेवक, राजकीय पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
तिरंगा यात्रेचा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने होईल. आयोजकांनी सर्व नागरिकांना ठरलेल्या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी केले आहे.
जामखेडमध्ये देशभक्ती, एकता आणि सैनिकांच्या शौर्याची प्रेरणा देणारी ही रॅली मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याची माहिती बाजीराव गोपाळघरे यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा