जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा नगरीत इस्लाम धर्माचे नबी व रसुल प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सहाब यांच्या जयंती निमित्त येथील मदारी वस्तीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थांंना शालेय साहित्यासह मिठाईचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खर्डा पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार गोकुळ इंगावले हे होते.त्यांनी मुस्लिम समाज बांधवांना पैगंबर जयंती निमित्त मनपुर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी मौलाना जाकीर सहाब,मुस्लिम विकास परिषदेचे प्रवक्ते रिजवान बागवान,जेष्ठ मार्गदर्शक शकुरभाई शेख,मदारी समाजाचे सलिमभाई मदारी आदिंनी हजरत मोहम्मद पैगंबर सहाब यांच्या कार्याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.यावेळी हाफिज जमीरभाई कुरैशी,वडार समाज संघटनेचे अध्यक्ष बबलु सुरवसे,युवा उद्योजक तौफिक तांबोळी,युवा नेते फिरोज मापाडी,जेष्ठ नेते सरदारभाई मदारी,सामाजिक कार्यकर्ते युसुफभाई बागवान,शौकतभाई शेख,जाकीरभाई आतार,हुसेन मदारी,फकीर मदारी,गुलजार मदारी आदि.पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५
Home
खर्डा शहर
खर्ड्यात प्रेषित "हजरत मोहम्मद पैगंबर सहाब"यांची जयंती उत्साहात साजरी;मदारी वस्तीत शालेय साहित्यासह मिठाईचे वाटप
खर्ड्यात प्रेषित "हजरत मोहम्मद पैगंबर सहाब"यांची जयंती उत्साहात साजरी;मदारी वस्तीत शालेय साहित्यासह मिठाईचे वाटप
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा