मानव विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण यांच्या मातोश्री बेबी लतिफ पठाण (वय ५५) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.
बेबी पठाण धार्मिक वृत्तीच्या, परोपकारी स्वभावाच्या आणि नेहमी समाजासाठी मदतीचा हात देणाऱ्या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांचे व्यक्तिमत्व प्रेमळ व आपुलकीचे होते. त्यांच्या जाण्याने समाजातील एक जिव्हाळ्याचा आधार हरपल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, दोन सूना आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार जामखेड येथे करण्यात येणार असून शोकाकुल वातावरणात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
जामखेड प्रतिनिधी / ६ सप्टेंबर २०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा