पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२८ जून
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत कोणीही समाजकंटक कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची कोणत्याही प्रकारची गये केली जाणार नाही. कारण समाजातील चांगल्या व शांतताप्रिय व्यक्ती आमच्या सोबत असून त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी खर्डा पोलीस दल नेहमीच कटीबध्द असेल असे आश्वासन सह्ययक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी दिले.
आगामी आषाढी एकादशी व बकरी ईद हे एकाच दिवशी येणारे दोन्ही सण शांततेत साजरे व्हावेत व कोणीही कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आज दि २८ जून रोजी रोजी सायंकाळी ६:०० ते ७:१० वाजताचे दरम्यान खर्डा पोलीस दलाच्या वतीने खर्डा शहरात रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चची सुरुवात खर्डा पोलीस स्टेशन येथे सुरू होऊन सोनेगाव चौक, गवंडी गल्ली, कमिटी, बाबळे चौक, सोनार गल्ली ,तांबोळी चौक, शिंपी गल्ली, बस स्टॅन्ड व खर्डा पोलीस स्टेशन असा रूट मार्च झाला समारोप करण्यात आला.
यावेळी खर्डेकरांनी शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन सहाययक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी केले आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर
१अधिकारी व १५पोलीस अंमलदार ,२ होमगार्ड यांचा सामावेश होता साधारण १ तास चाललेला रूट मार्च शांततेत संपला
No comments:
Post a Comment