पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-५ जुलै
अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा वाढदिवस जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा येथे विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करण्यात आला. मोहा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या निवारा बालगृहातील अनाथ- निराधार विद्यार्थ्यांना ५० डझन वह्या आणि पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा गृहाचे सर्वेसर्वा ॲड. डॉ. अरूण जाधव यांच्या उपस्थितीत व जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. के. माने, कैलास खैरे, सिद्धनाथ भजनावळे, सुनील मिसाळ, केंद्रप्रमुख पारखे सर, मुख्याध्यापक हपटे सर, शिक्षक विजय जाधव, रजनीकांत साखरे, निवारा बालगृहाचे चव्हाण सर, केसकर सर उपस्थित होते.
निवारा बालगृहातील मुले मोहा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकतात. या मुलांचे पालकत्व ॲड. अरुण (आबा) जाधव यांनी घेतले आहे. त्यांच्या उपस्थितीत व सर्व पंचायत समिती अधिकारी शिक्षक यांच्या समवेत केक कापून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
या निमित्ताने या सर्व उपेक्षित मुलांनी अशिष येरेकर यांच्या प्रमाणे अभ्यास करून अधिकारी व्हावं अशी प्रेरणा मुलांना देण्यात आली. यावेळी येरेकर यांना या सर्व मुलांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment