पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-५ जुलै
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथे काल मंगळवार दिनांक ४ रोजी लक्ष्मी आईचा गावगाडा काढण्यात आला. तब्बल दहा वर्षानंतर हा गाव गाडा निघाल्याने हा गावगाडा पाहण्यासाठी बरेच लांबून भाविक भक्त मोठ्या संख्येने खर्डा गावात हजर राहिले होते . काल सकाळी दहा वाजता गोपाळ कृष्ण मंदिरासमोर अकरा पुरोहितांच्या हस्ते होम हवन करण्यात आले . या गाव गाड्यांमध्ये तब्बल १०१ पोतराज, १०१हलक्या ,अनेक आराधी मंडळ, विविध भागातून आलेले लक्ष्मी आई वर श्रद्धा असणारे हजारो भाविक भक्त या गावगाड्यात सामील झाले होते. हळदी कुंकवाने सर्व भाविक रंगून गेले होते. लक्ष्मी आईचा उदो उदो करत रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा फुल्ल झाल्या होत्या . गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लक्ष्मी आईचे मंदिराच्या समोर हा गावगाडा गावातून वाजत गाजत मिरवणुकीने सोडला जातो. या गाव गाड्याला खर्डा येथील कसबा पेठेत पाटील सरपंच यांच्या हस्ते मान सन्मान दिला .या गाव गाड्याची विधिवत पूजा यावेळी करण्यात आलीज्या ज्या वेळी गावावर संकट येते, मोठी आपत्ती येते, दुष्काळ पडतो, महापुर येतो, रोगाची साथ येते, अशा संकट समयी गावाबाहेरील हा गावगाडा गावामध्ये आणून होम हवन करून मंत्राच्या उच्चारात, पोतराजांच्या हस्ते पूजा करून गावाच्या बाहेर सोडला जातो.अशी प्रथा आजही कायम आहे. तब्बल दहा वर्षानंतर निघालेला हा गाव गाडा पाहण्यासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती .
, तसेच अबाल , वृध्द,पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावाचे संकट टळू दे , चांगला पाऊस पडू दे आणि सर्वांना सुखी ठेव असे साकडे घालण्यात आले.
व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लक्ष्मी आईचे भक्तगण गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी व तरुण मंडळ यांनी प्रयत्न केले , मोठी गर्दी असल्याकारणाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामुळे खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment