पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२५ जुलै
माजी सरपंच आसाराम गोपाळघरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खर्डा शहरातील नवीपेठ येथे विविध मान्यवरांच्या हस्ते अद्यावत अश्या "ए.जी. फिटनेस क्लब" या जिमचे (व्यायामशाळा) उद्घाटन करण्यात आले.
खर्डा ग्रामपंचायतचे माजी सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी खर्डा व परिसरातील युवक व तरूणांसाठी अद्यावत अशी जीम सुरू केली असून आज दि. २५ जुलै रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते या जीमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ, भाजपा नेते रविंद्र सुरवसे, सरपंच वैजीनाथ पाटील,उपसरपंच सुग्रीव भोसले, माजी सरपंच संजय गोपाळघरे, नाहूली उपसरपंच काका गर्जे , श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, डॉ. सोपान गोपाळघरे, गणेश शिंदे, महेश दिंडोरे, जय भगवान युवा मंच व ग्रामस्थ युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खर्डा हे शहर पंचक्रोशीतील मोठे गाव असून या ठिकाणी जीमची गरज होतीच. तीच गरज ओळखून खर्डा येथील धडाडीचे कार्यकर्ते व माजी सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी एक अद्यावत जीम सुरू करून तरूण व ग्रामस्थांना आपले शरीर व आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी संधी निर्माण करून दिली आहे. या ठिकाणी उद्यावत व्यायाम साहित्य व ट्रेनर उपलब्ध करून दिला असून या जिमचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थितांमधून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment