पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२५ जुलै
कर्जत तालुक्यात MIDC मंजूर व्हावी म्हणून आ.रोहित पवार हे काल मंत्रालयाच्या परिसरामध्ये उपोषणाला बसले होते. परंतु मागील सरकारमध्ये सत्तेत असताना देखील त्यांना एमआयडीसी मंजूर करता आली नाही. परंतु आज विरोधात असल्यामुळे आपल्याला आलेल्या अपयशाचे खापर हे सत्ताधाऱ्यांवर कसे फोडावे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आ. रोहित पवार यांनी केलेला दिसतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सत्तेत असताना देखील त्यांना जे करता आले नाही. आणि त्याचे खापर ते आ. प्रा.राम शिंदे यांच्यावर फोडत आहेत.
स्वतःचा हळगाव येथे असलेल्या साखर कारखान्यातील कित्येक युवकांना कामावरून काढून बेरोजगार केले आहे आणि आज तरुणांची दिशाभूल करत त्यांना रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देत आहेत. म्हणूनच त्यांना आलेल्या या वैफल्यातून खालच्या पातळीची भाषा वापरून अरेरावी करत असल्याचे दिसून येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा