पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २३ जुलै
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतच्या विभाजनाचा प्रश्न चिघळत चालला असून ग्रामसभा मासिक सभा, पत्रकार परिषदांमधून झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर विरोधी ग्रामपंचायत सदस्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवपट्टण विकास युवा मंच आता जास्त अक्रमक झाला असून विरोधकांच्या भुमिकेला प्रतिउत्तर देण्यासाठी आज दि. २३ जुलै रोजी खर्डा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. तसेच उद्या दि. २४ रोजी ग्रामपंचायत विभाजनासाठी होणारी विषेश ग्रामसभाही वादळी होण्याची चिन्हे दिसत असून या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून हालचाली होऊन ग्रामपंचायत विभाजनासाठी आग्रही असलेल्या खर्डा येथील तरूण व ग्रामस्थ यांची भुमिका समजून घेऊन मार्ग काढणे गरजेचे आहे.
सविस्तर असे की, खर्डा येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत विभाजनाच्या ठरावाला पाठिंबा देऊन काही ग्रामपंचायत सदस्यांनी भूमिका बदलून ग्रामपंचायत विभाजनाला विरोध केल्याच्या निषेधार्थ आज खर्डा शहर बंद पुकारण्यात आला होता. . दि १२ जुलै रोजी खर्डा ग्रामपंचायत ने ग्रामसभा आयोजित केली होती. त्यावेळी गावातील तरुणांनी खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव अचानकपणे ग्रामसभेत मांडला होता. एकूण १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी १४ ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाला पाठिंबा असल्याचे ग्रामस्थांसमोर उभे राहून सांगितले होते. यासंदर्भात २१ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १६ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते .त्यापैकी सत्ताधारी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुकीच्या एक वर्षा अगोदर खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा निर्णय घेण्याचा सदर मीटिंगमध्ये विषय मांडला. त्याला आठ ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध करून ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव मासिक मीटिंगमध्ये करावा अशी मागणी केली व विभाजनाचा ठराव होण्यासाठी आठ ग्रामपंचायत सदस्य बाजूने उभे राहिले. तर सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांनी विभाजनाचा लगेच होणाऱ्या ठरावाला विरोध केला त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी अचानक भूमिका बदलल्याच्या कारणामुळे खर्डा शहर बंद करण्याचा निर्णय खर्डा शहरातील युवक, शेतकरी व व्यापाऱ्यांनी घेतला. व त्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.
पोलीस प्रशासनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
No comments:
Post a Comment