सद्गुरु संतश्री गोदड महाराजांच्या रथयात्रेसाठी पंढरपूरहुन येणार पादुका, आ.रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश ,कर्जतमध्ये रंगणार श्रेयवादाची लढाई - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

बुधवार, १२ जुलै, २०२३

Home राजकीय बातम्या सद्गुरु संतश्री गोदड महाराजांच्या रथयात्रेसाठी पंढरपूरहुन येणार पादुका, आ.रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश ,कर्जतमध्ये रंगणार श्रेयवादाची लढाई

सद्गुरु संतश्री गोदड महाराजांच्या रथयात्रेसाठी पंढरपूरहुन येणार पादुका, आ.रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश ,कर्जतमध्ये रंगणार श्रेयवादाची लढाई

बुधवार, जुलै १२, २०२३ राजकीय बातम्या,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१२ जुलै

 थोर विठ्ठलभक्त आणि कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांच्या रथयात्रेनिमित्त दरवर्षी पंढरपूरहून पादुका आणण्याच्या आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश येताना दिसताच विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्याही दोन कार्यकर्त्यांनीही याबाबतचे पत्र पंढरपूरच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समितीला दिले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन आता दोन आमदारांमध्ये कर्जतमध्ये श्रेयवादाची लढाई रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे मागील वर्षी २५ सप्टेंबर २०२२ रोजी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले असताना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि विशेष कार्यकारी अधिकारी बालाजी पुदलवाड यांची भेट घेतली होती. यावेळी समस्त कर्जतकर नागरिकांच्यावतीने त्यांना पत्रही दिले आणि विठ्ठलाचे परमभक्त संतश्री सद्गुरू गोदड महाराज यांची विठ्ठलभक्ती लक्षात घेता त्यांच्या रथोत्सवानिमित्त दरवर्षी पंढरपूरहून श्री विठ्ठलाच्या पादुका कर्जतला घेऊन येण्याची विनंती केली होती. सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांचा जन्म कर्जत शहरातील असून त्यांना पांडुरंगाने साधू वेशात येऊन "तू तुझ्या जन्मस्थळी समाधीस्थ हो, ते एक महाक्षेत्र म्हणून उदयास येईल", असा आशीर्वाद दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार संजीवन  समाधी घेताना सद्गुरु संतश्री गोदड महाराजांनी पांडुरंगाकडून आषाढीनंतर येणाऱ्या कामिका एकादशीला भेटीसाठी कर्जत येण्याचे वचन घेतले होते. तेंव्हापासून साक्षात भगवान पांडुरंग हे सद्गुरू संतश्री गोदड महाराजांच्या भेटीला कर्जतला येत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच राज्यातील विविध संतांच्या दिंड्या-पालख्या आषाढी-कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जातात, परंतु सद्गुरु संतश्री गोदड महाराजांची दिंडी वारीसाठी पंढरपूरला जात नाही आणि आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या कामिका एकादशीला पांडुरंगाची मूर्ती रथामध्ये ठेवून कर्जतमध्ये ग्रामप्रदक्षिणा घातली जाते. यावेळी कर्जत तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य भाविक कर्जतमध्ये सद्गुरू गोदड महाराज आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात. 

त्यामुळेच आमदार रोहित पवार यांनी मंदिर समितीचे सदस्य आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांच्या सन्मानार्थ दरवर्षी पंढरपूरहुन पादुका कर्जतला पाठवण्याची, विनंती केली होती. लोकभावना आणि श्रद्धा लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून सादर केलेल्या या निवेदनाचा पंढरपूर मंदिर समितीने सकारात्मक विचार केला आणि त्यानुसार पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य अंमळनेकर महाराज आणि इतर विश्वस्तांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यानंतर गुरुवारी कामिका एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाच्या पादुका कर्जतला येणार आहेत. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी काल अडीच किलो वजनाच्या चांदीच्या पादुकाही सद्गुरु संतश्री गोदड महाराज मंदिर समितीला दिल्या आहेत. विशेष म्हणजे या पादुका आमदार रोहित पवार यांना पंढरपूरला घेऊन जाऊन तिथं विधिवत पूजा करुन स्वतः आणता आल्या असत्या. पण याचे श्रेय न घेता कोणतेही राजकारण होऊ नये आणि प्रथा-परंपरा जपल्या जाव्यात यासाठी या पादुका सद्गुरु संतश्री गोदड महाराज मंदिर समितीचे सेवेकरी, मानकरी, विश्वस्त या सेवा करणाऱ्या मंडळींकडे त्यांनी सुपूर्द केल्या.
दरम्यान, दुसरीकडे या अध्यात्मिक उपक्रमाला आता राजकीय वळण मिळते की काय अशी जोरदार चर्चा कर्जत तालुक्यात सुरु झाली आहे. कारण विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनीही दोन दिवसांपूर्वी त्यांच्या दोन कार्यकर्त्यांकरवी पादुका पाठवण्याबाबतचे पत्र पंढरपूर मंदिर समितीला दिले आहे. प्रा. राम शिंदे यांचा हा केवळ श्रेयासाठीचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. कारण आमदार रोहित पवार यांनी मागील वर्षी केलेल्या मागणीमुळे आणि पाठपुराव्यामुळे पंढरपूरहून पादुका आणण्याचा निर्णय घेण्यात आाला आणि याचे श्रेय आपल्याला मिळावे यासाठीच प्रा. राम शिंदे यांच्यामार्फत पत्र देण्याची औपचारीकता आता केली जात असल्याचे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 


प्रतिक्रिया

सद्गुरु संतश्री गोदड महाराजांवर आमची सर्वांचीच श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपायीच पंढरपूरहून पादुका आणण्याची विनंती आम्ही सुमारे ४०० जणांनी मिळून पंढरपूर मंदिर समितीला केली होती. ही मागणी आज पूर्ण झाल्याचे दिसताच नेहमीप्रमाणे त्याचे श्रेय मिळावे म्हणून काही मंडळी खडबडून जागी झाली आणि याबाबत पत्र देण्याचे ढोंग करत असतील तर याबाबत आम्हाला काहीही म्हणायचे नाही. पण लोकंच त्यांचे ढोंग उघड करतील. आम्ही निःस्वार्थीपणे सेवा करत राहू. दोन दिवसांपूर्वीच बाबांच्या (राजेंद्रदादा पवार) हस्ते सेवा म्हणून चांदीची मेघडंबरी मंदिर समितीकडे सुपूर्द केली आणि काल पादुकाही दिल्या. आमच्यासाठी ही सेवा सर्वांत महत्त्वाची आहे.

- रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at बुधवार, जुलै १२, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

प्रशासनाची कठोर कारवाई: जिवंत व्यक्तीला मृत दाखवणारा ग्रामसेवक सेवेतून निलंबित

जामखेड येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ: औंढा नागनाथमध्ये धक्कादायक घटना;गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गीते, व अक्षय आठवले यांनी केली मारहाण

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *