पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१२ जुलै
आज दि. १२ जुलै रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ व युवकांनी खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत सहा वाड्यांचे विभाजन करून खर्डा शहराची वेगळी ग्रामपंचायत करण्याचा एकमुखी निर्णय घेऊन ठराव घेण्यात आला. यावेळी मोठा गोंधळ उडाला होता परंतु खर्ड्यातील युवकांनी ग्रामपंचायतचे विभाजन झालेच पाहिजे असा रेटा लावून धरल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्यांनी उभे राहून या ठरावाला पाठिंबा दिला. त्यामुळे खर्डा ग्रामपंचायतच्या विभाजनाचा लेखी ठराव एकमुखाने घेण्यात आला व हा ठराव पुढील कारवाईसाठी ग्रामविकास मंत्रालय पुढे मांडण्यात येणार असून याला मंजुरी मिळाल्यानंतर खर्डा शहरासाठी नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे?
याबरोबरच अनेक ठरावही यावेळी करण्यात आले.
१) पाणीपुरवठा योजनेतून स्वच्छ व पाणीपुरवठा करणे
२) गावाच्या नावात झालेला बदल शिवपट्टण करणे.
३)जुनी ग्रामपंचायत इमारत हटवणे
४)खर्डा गावात फिरणारे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे
५) पाणी पट्टी कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली
६)ईट रोड वरील मार्केट जवळील वेस
७)खर्डा ग्रामपंचायतमधील व्यवसाय नसलेले गाळे बाबत
८) नळ पाणी पुर्वाअंतर्गत येत असलेले गढूळ पाणी बाबत
९) जुनी ग्रामपंचायत राम हवेली गडी येथील रस्ता रुंदीकरण
१०) गोपाळवाडा तलावाच्या भरावर काटेरी झुडपे तोडणे बाबत
११) खर्डा येथील गवंडे गल्ली येथील व्यायम शाळा बांधण्याबाबत
१२) सरपंच व सदस्य यांच्या कुटुंबातील व्यक्ती हस्तक्षेप बाबत
तसेच येथील जलजीवन मिशन योजने बाबत चर्चा करण्यात आली. हागणदारीमुक्त अधिक (ODF +) वैयक्तिक शौचालय बाबत चर्चा, मा. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजने साठी जागा बाबत चर्चा करण्यात आली. . तसेच ग्रामसभेत अनेक चर्चा करण्यात आल्या.
अनेक दिवसानंतर खर्ड्याच्या ग्रामसभेला ग्रामस्थ व बहुसंख्य युवकांनी विविध प्रश्न मांडून ग्रामपंचायतला जाब विचारण्यात आला, त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासना सहित ग्रामपंचायत सदस्य सुद्धा हतबल झाल्याचे दिसून येत होते. सदर घेण्यात आलेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजीवनी पाटील या होत्या तर ग्रामसभेचे प्रास्ताविक व आभार ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी मांडले. या ग्रामसभेला विविध विभागाचे अधिकारी, महिला, युवक खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment