पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१३ जुलै
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सालाबाद प्रमाणे याहीवर्षी विविध सार्वजनिक सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे, त्यासाठी खर्डा येथील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये समाज मंदिरात जयंती उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अध्यक्षपदी अमोल अडागळे, उपाध्यक्षपदी ऋषी शिंदे, सचिव रोहित डाडर, तर खजिनदारपदी गणेश मोरे यांची यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी गणेश जाधव, शंकर गायकवाड, सह खजिनदार संभाजी मोरे, सल्लागारपदी अखिलेश शिंदे व अमोल कांबळे यांचीही यावेळी निवड करण्यात आली.
याप्रसंगी अण्णाभाऊ साठे स्मारकाचे संस्थापक अध्यक्ष विलास नाना जाधव, रामा शिंदे, दादा मोरे, विनोद दाहर, जयवंत गायकवाड, निलेश मोरे, शंकर अरुणे, भारत शिंदे, काशिनाथ शिंदे, गणेश दाडर प्रकाश शिंदे, किरण जाधव, राहुल ढाले यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक संपन्न झाली. याप्रसंगी मुकेश अडागळे, अशोक दाडर, किरण गायकवाड, समाधान जाधव, आतिश जाधव, मनोज शिंदे, पप्पू आल्हाट, मिलिंद दार, निखिल अडागळे, विशाल अमोल डाले, किसन धाकले, अक्षय पोडमल, राणा अडगळे, भैय्या कांबळे, इत्यादी समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार बाळासाहेब शिंदे यांनी केले, तर ग्रामपंचायत सदस्य राजू मोरे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment