पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २७ जुलै
आ. रोहित पवार हे तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करीत असताना याचे श्रेय रोहित पवार यांना मिळू नये. यासाठी म्हणून एमआयडीसीला विरोध करणाऱ्या आमदार राम शिंदे यांना कर्जत जामखेड मधील जनता व युवा वर्ग माफ करणार नाही. आ. राम शिंदे स्वतः दहा वर्ष मतदार संघाचे आमदार व पाच वर्षे तेरा खात्यांचे मंत्री असताना त्यांनी एमआयडीसी होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. जर कर्जत येथे एमआयडीसी झाली तर तरुणांना नोकऱ्या मिळतील, वर्ग राष्ट्रवादीकडे आकर्षित होईल व याचे श्रेय आ. रोहित पवार यांना जाईल या भीतीने ते एमआयडीसीला विरोध करीत आहेत. पुढील काळात त्यांना जनता माफ करणार नाही. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आज सकाळी ९.४५वाजता बस स्थानका समोर आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यातून होणाऱ्या एमआयडीसी विरुद्ध तसेच विविध विकास कामांना स्थगिती देणाऱ्या आ. प्रा. राम शिंदे यांचा व भाजपाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदार संघाचे क्षेत्र प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, खर्डा सोसायटीचे चेअरमन मुकुंद गोलेकर, व्हॉइस चेअरमन शिवाजी भोसले, चंद्रकांत गोलेकर, दत्तात्रेय भोसले, जातेगाव सरपंच रविराज गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत लोखंडे, महालिंग कोरे, अशोक खटावकर, दीपक जावळे, राजेंद्र गोलेकर, एजाज जिकरे, कपिल लोंढे, सुनील साळुंखे, संजय सुर्वे, बबन मदने, मोहन सुरवसे, रामहरी गोपाळघरे, अरुण चिंचकर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनीही आपले मत मांडले व तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला. ते म्हणाले की, आ. राम शिंदे हे विधान परिषदेचे आमदार झाल्यापासून मतदारसंघात आ. रोहित पवार यांनी आणलेल्या निधीला स्थगिती देण्याचे काम करीत आहेत. आ. प्रा.राम शिंदे यांनी उलट सरकारकडून जास्तीचा निधी आणण्यासाठी प्रयत्न करावा. परंतु त्यांना कशाला विरोध करावा हेच कळत नाही. पुढील निवडणुकीत जनता त्यांना दाखवून देईल व दीड लाख मतांनी त्यांचा पराभव करेल अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी यावेळी केली
यावेळी निषेधार्थ उपस्थितीत कार्यकर्त्यांनी आ. राम शिंदे व भाजपचा निषेदाच्या घोषणा देऊन खर्डा परिसर दणाणून टाकला होता.
No comments:
Post a Comment