पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१३ ऑगस्ट
जामखेड पोलीसांना एक अनोळखी लहान मुलगा मिळाला असून तो जामखेड पोलीसांच्या ताब्यात असून ज्यांचा हा मुलगा आहे. त्यांनी ओळख पटवून सदर मुलगा आपल्या ताब्यात घ्यावा असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.
जामखेड शहरातील खर्डा रोडवर असलेल्या हाॅटेल महेश येथे सदर मुलगा मिळून आला असून त्याला आपले नाव, गाव किंवा पत्ता सांगता येत नाही. त्यामुळे जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर मुलांच्या नातेवाईकांना आवाहन करण्यात आले आहे.
जर या मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास
जामखेड पोलीस स्टेशन संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : जामखेड पोलीस स्टेशन क्रमांक -02421 221033 , पोलीस कॉन्स्टेबल सचिन पिरगळ 9595645450
No comments:
Post a Comment