पोलीस वारंट न्यूज नेटवर्क- २६ ऑगस्ट
जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस बलाच्या गट क्रमांक 19 या युनिटच्या वतीने भालाफेक, गोळाफेक,१०० मीटर धावणे, खो खो, हॉलीबॉल,कबड्डी खेळ अशा अनेक स्पर्धांच आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला व पारितोषिक मिळविली.
'मेरी माटी-मेरा देश" या संकल्पनुसार संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी . या अभिनव उपक्रमाचे आयोजक समादेशक सहाय्यक विकास पाटील, पोलीस निरीक्षक मधुकर मोर्ला, दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक वैभव टेकवडे, पांडुरंग बुरांगे, अजित कुंभार, संदीप जाधव, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार जामखेडचे सभापती पै शरद कार्ले, माजी सरपंच बापुराव ढवळे, सरपंच राजेंद्र ओमासे, कुसडगावचे सरपंच पप्पु कात्रजकर, अजय सातव, नजिरभाई तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment